संग्राम थोपटेंच्या १९ समर्थकांवर गुन्हे दाखल

    दिनांक  02-Jan-2020 10:45:39
|
Pune Congress office Sang
 

थोपटेंना मंत्रीपद न मिळाल्याने  काँग्रेस कार्यालयात केली होती तोडफोड


पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पुणे काँग्रेस भवनाची तोडफोड केली होती.


 

या प्रकरणी पुणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, ज्यांनी तोडफोड केली ते माझे कार्यकर्ते नव्हते, अशी प्रतिक्रीया संग्राम थोपटे यांनी दिली होती. हे सर्व कार्यकर्ते भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यातील असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

 

मंगळवार, दि. ३१ डिसेंबर रोजी २० ते २५ जणांनी पुण्यातील काँग्रेस कार्यालयात घुसून दगडफेक केली होती. कार्यालयातील खुर्चा आणि इतर वस्तूंची तोडफोड केली होती. त्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणाची दखल घेत पोलीसांनी ही कारवाई केली आहे.

 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.