हार्दिक पटेल यांना न्यायालयीन कोठडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2020
Total Views |


hardik patel_1  


अहमदाबाद : अनेकदा नोटीस बजावल्यानंतरही न्यायालयात सुनावणीदरम्यान अनुपस्थित राहिल्याने अटकेत असलेले काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना रविवारी न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. हार्दिक पटेल यांना शुक्रवार दि. २४ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश रविवारी सत्र न्यायालयाने दिले. २०१५ साली एका प्रकरणात पटेल यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता.


त्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. याप्रकरणी न्यायालयाने हार्दिक यांना अनेकदा सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले. मात्र अनेकदा नोटीस बजावून देखील हार्दिक पटेल काही सुनावणीसाठी न्यायालयात हजर न राहिल्याने अखेर त्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. शनिवारी पोलिसांनी त्यांना अटक केली. रविवारी त्यांना न्यायालयात दाखल करण्यात आले असता त्यांना सहा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@