संस्कृती रक्षक ‘किरण’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


kiran joshi_1  देशाचा इतिहास व ‘हिंदू संस्कृती’ यांचा वारसा कथन करणारी ऐतिहासिक साधने म्हणजे ग्रंथ,पुराणे व पोथ्या. हा समृद्ध वारसा जतन करणार्‍या सोलापूरच्या किरण जोशी यांच्याविषयी...उत्तर सोलापुरात ६०० ते ७०० वर्षांपूर्वीचे जुने विठ्ठल मंदिर आहे
. त्या मंदिराच्या पूजेचे पिढीजात अधिपत्य पुजारी किरण जोशी यांच्याकडे आहे. ख्यातनाम लोकशाहीर राम जोशी हे किरण यांचे पूर्वज. ६०० वर्षांपूर्वीपासून सोलापुरात वास्तव्यास असणार्‍या या जोशी घराण्याला मोठा इतिहास आहे. माधवराव पेशवे यांनी किरण जोशी यांच्या पूर्वजांना ज्योतिषशास्त्रातील अभ्यास पाहून जमिनी इनाम दिल्या होत्या. हाच पिढीजात वारसा पुढे चालवत, तेच पौरोहित्य जपत एक अनोखा छंद किरण जोशी यांनी जोपासला आहे. त्यांच्या घराण्यात ज्योतिषाचार्याचा वारसा असल्याने काही ठराविक संस्कृत ग्रंथ होते. यातील काही ग्रंथ किरण जोशी यांच्या हाती लागले. त्यात त्यांच्या घराण्यात परंपरेने आलेली यजुर्वेदाची पोथी आली, ती पोथी पाहताच त्यांच्या मनात आले की, यासारख्या अनेक दुर्मीळ पोथ्यांचा संग्रह आपल्याकडे असावा. त्यांच्या मनातील तो विचार त्यांनी त्यांच्या गुरूंजवळ व्यक्त केली. गुरुजींनी आशीर्वाद दिला. म्हणाले, “हे मोठेच पुण्यकर्म आहे!” याच प्रेरणेतून आज किरण जोशी यांच्याकडे जवळपास एक हजारांहून अधिक दुर्मीळ हस्तलिखितांचा, ग्रंथांचा तसेच पोथ्यांचा संग्रह आहे.बालपणापासून वेदांकडे ओढा असलेल्या किरण यांना वेदमूर्ती देवीदास सांगवीकर यांनी पौरोहित्यासाठी लागणार्‍या विधींचे पाठ दिले
. पुढे त्यांनी वेदमूर्ती नारायण शास्त्री वांगीकर यांच्याकडूनही वेदविद्येचे पाठ घेतले. याच दरम्यान अनेक ग्रंथ व पोथ्यांची माहिती त्यांना होत गेली. याच दरम्यान अनेक दुर्मीळ पोथ्या त्यांनी संग्रही केल्या. किरण यांचे पणजोबा ‘एचएमव्ही’ कंपनीचे चार जिल्ह्यांचे डिलर म्हणून काम करत होते. त्यांनी फिरतीच्या काळात अनेक वस्तू संग्रहीत केल्या होत्या. पणजोबांच्या संग्रहगुणाने व परंपरेने आपल्याकडे आलेल्या इतरही अनेक गोष्टी किरण यांनी जपल्या आहेत.mansa_1  H x W:


किरण जोशी यांनी या पोथ्या संग्रही करण्यासाठी सोलापूरमध्ये व आसपासच्या गावांमध्ये जाऊन अनेक हस्तलिखिते मिळवली. उस्मानाबाद, बसवकल्याण, भंडारकवठे, पंढरपूर इत्यादी गावांतूनही पोथ्या मिळवल्या. यासाठी त्यांना अनेक कुटुंबांकडे जावे लागले, त्यांच्या माळ्यांवर, कुठेतरी अडगळीत पडलेली पोथ्यांची गाठोडी मिळवून सोडली व त्यातील ज्ञान समाजासमोर येण्याचा मार्ग मोकळा केला. विशेष बाब म्हणजे, या पोथ्या व ग्रंथ देताना कोणी त्यांच्याकडून पैसे घेतले तर कोणी रद्दी नेताय खुशाल न्या!’ असे म्हटले. याविषयीचे काही अनुभव कथन करताना जोशी सांगतात, “मी अनेक हस्तलिखिते घाटावर-नदीत पोथ्या, ग्रंथ विसर्जित करायला येणार्‍या लोकांकडून जमा केले आहे. एक कुटुंब त्यांच्या तीन खोल्या भरून असणारे ग्रंथ रद्दीत विकायला निघाले होते, त्याची माहिती मला मिळाली. मी त्वरित तिथे जाऊन हे ग्रंथ ताब्यात घेतले. त्यात मला शेकडो दुर्मीळ, वेगवेगळ्या विषयांवरील हस्तलिखिते मिळाली.”

 


काही निवडक ग्रंथांची यादी :


mansa_1  H x W:


हा सर्व पोथ्यांचा ऐवज ठेवण्यासाठी ‘माँ भारती मंदिर’नामक भव्य तीन मजली वास्तू उभी केली आहे. त्या वास्तूत केवळ ग्रंथ आहेत. माणसांनी तेथे राहायचे तर नाहीच त्याचबरोबर कोणत्याही अन्य प्रकारे त्या वास्तूचा उपयोग करायचा नाही, असा किरण यांचा मानस आहे. किरण यांनी सुमारे १००वर्षांपूर्वीच्या सरस्वती, लक्ष्मी यांच्या आठ फुटी सुबक मूर्ती मिळवल्या आहेत. किरण यांच्याकडील बहुतांश हस्तलिखिते तसेच पोथ्या या हजारो वर्ष जुन्या होत्या. त्यांची पाने जीर्णावस्थेत होती. अशा पोथ्या जतन करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. अशातच त्यांची ओळख नाशिकच्या अनिता जोशी यांच्याशी झाली. किरण जोशी यांच्याकडील या दुर्मीळ साहित्याचा खजिना पाहून अनिता जोशी थक्क झाल्या. अनिता जोशी या पुणेस्थित ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था’या ठिकाणी कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांना दुर्मीळ हस्तलिखिते व पोथ्यांचे जतन करण्याविषयीची माहिती होती. त्यांनी जोशी यांना जुन्या कागदपत्रांचे रक्षण कसे करायचे त्याची माहिती दिली.

 
mansa_1  H x W:


रसायनविरहित पुठ्ठे व कापडाच्या मदतीने या पोथ्या बांधून ठेवल्या आहेत
. तसेच अनिता जोशी यांनी या ऐतिहासिक अथवा प्रागैतिहासिक काळातील दस्तवेजाची केंद्र सरकारकडे नोंद करण्यास किरण यांना मदत केली, जेणे करून त्याबाबत संशोधन करणार्यांस गरज लागल्यास त्या व्यक्तीकडे जाऊन त्याचा लाभ घेता येईल. किरण जोशी आपल्या या समृद्ध दुर्मीळ दस्तावेजाच्या जतनात अनिता जोशींचे मोठे योगदान असल्याचे सांगतात. तसेच याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणतात, “मी केवळ छंद म्हणून सर्व ग्रंथ व साहित्य संग्रह करत गेलो. परंतु, त्याचे जतन झाले ते केवळ अनिता जोशी यांच्या मार्गदर्शनामुळे. या ग्रंथ उभारणीत माझा केवळ ३०टक्के वाटा आहे. बाकी ७०टक्के मेहनत ही अनिता जोशी यांची आहे.”

 किरण जोशी यांच्याकडे धार्मिक संहिता
, पौराणिक ग्रंथ यांबरोबरच ज्योतिष व आयुर्वेदासंबंधीच्या पोथ्याही आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी हा सर्व संग्रह एका व्यक्तीस देण्याचेही ठरवले. परंतु, आपण जपलेला हा वारसा चुकीच्या व्यक्तीच्या हातात जाऊ नये याचीच फक्त त्यांना चिंता वाटते. हा वारसा योग्य व्यक्तीच्या हाती गेला तर सोने, नाहीतर माती अशी त्यांची स्थिती असते. देशातील विविध भागातील अभ्यासक जोशी यांच्या ग्रंथदालनाला भेट देत असतात. इतिहास अभ्यासक माया पाटील, नभा काकडे यांनी या ग्रंथदालनाला भेट दिली आहे. सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांसारख्या राजकीय व्यक्तीमत्वांनीही भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर भेटीत किरण जोशी यांनी नरेंद्र मोदी यांना ३००वर्ष जुनी ‘गीता’ भेट दिली. ही गीता त्यांना गुजरात म्हणजे सुदामानगरीतून मिळाली होती. पंतप्रधानांनी ही किरण जोशी यांच्या ऐतिहासिक वारशाचे व त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. हिंदू संस्कृती व साहित्याचे जतन करत भारताचा हा इतिहास जगासमोर अभ्यासासाठी खुले करणारे किरण जोशी हेच खरे ‘हिंदू संस्कृती रक्षक’ आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही !


mansa_1  H x W:

 

@@AUTHORINFO_V1@@