ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या चारचाकीला अपघात

18 Jan 2020 18:57:05

shabana_1  H x


अपघात अभिनेत्री शबाना आझमी जखमी


पनवेल : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या चारचाकीला शनिवारी सायंकाळी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात शबाना गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. शबाना यांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


शबाना यांच्यासोबत कारमध्ये त्यांचे पती जावेद अख्तरही होते. मात्र त्यांना कोणतीही इजा झालेली नाही, असे सांगण्यात येत आहे. शबाना यांच्या कारची ट्रकवर मागून धडक बसल्याने हा अपघात झाला. अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. लवकरच शबाना यांना मुंबईतील रुग्णालयात हलवले जाणार आहे. त्या पतीसोबत खालापूरमार्गे प्रवास करत होत्या. त्यावेळेस हा अपघात घडला.

Powered By Sangraha 9.0