शिर्डीकर मुख्यमंत्र्यांवर नाराज : कायदेशीर लढाईचा इशारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2020
Total Views |
Uddhav Thackeray _1 



शिर्डी बंदला २५ गावांचा पाठींबा


शिर्डी : संपूर्ण देशाचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डीतील साईमंदिराच्या आसपासचा परिसर सध्या तणावाखाली आहे. साईबाबा यांचे जन्मस्थान पाथर्डी की शिर्डी यावरून सुरू झालेल्या वादामुळे आता 'शिर्डी बंद'ची हाक देण्यात आले आहे. शिर्डी बंद ठरावासाठी ग्रामसभा बोलावण्यात आली असून हा बंद चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बंदला एकूण २५ गावांनी पाठींबा दर्शवला आहे.

 

देशविदेशातून भक्तजण साईंच्या चरणी दर्शनासाठी येतात. मात्र, रविवारपासून येणाऱ्या भक्तांना थोडे सबूरीने घ्यावे लागणार आहे. बेमुदत बंदामध्ये या ठिकाणी असणाऱ्या हॉटेल्स, उपहारगृह, दुकानमालकांनी सहभाग घेतल्याने भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. साईंचे जन्मस्थळी पाथरीच आहे, असा दावा केल्यानंतर हा प्रकार आणखी चिघळला.

 

उद्धव ठाकरे यांच्यामुळे चिघळला वाद ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना साईबाबांचे जन्मस्थळ हे पाथरी आहे, असा उल्लेख करून या पाथरी तीर्थक्षेत्र विकासासाठी विकास आराखडा मंजूर झाल्याचे सांगितले. लवकरच या आराखड्याचे भूमीपूजन होणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. यानंतर शिर्डीकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली. साईबाबांनी हयात असताना आपल्या जातीचा धर्माचा उल्लेख कधीच केला नाही, जगाला सर्वधर्म समभाव हा संदेश देत पडक्या मशिदीत राहुल गोरगरीबांची सेवा केली. ते कुठून आले हे त्यांनी आपल्या हयातीत कधीच सांगितलेच नाही, अशी माहिती साईसतचरित्रात असताना साईंच्या जन्मस्थळाचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी नव्या वादाला तोंड फोडल्याचा आरोप शिर्डीकरांनी केला आहे.

 

खासदार डॉ. सुजय विखेंचा कायदेशीर लढाईचा इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप खासदार डॉ. सुजय विखेपाटील यांनी नाराजी व्यक्त करत वेळ आल्यास कायदेशीर मार्गाने लढाई लढू असा थेट इशाराच ठाकरे यांना दिला आहे. शिर्डी साई संस्थान ट्रस्टच्या मते, आम्हाला पाथरीच्या विकासावर आक्षेप नाही. मात्र, साईबाबांच्या जन्मस्थानाचा उल्लेख करणे योग्य नाही.




@@AUTHORINFO_V1@@