साराच्या ‘लव आज कल’वर सैफ नाराज?

    दिनांक  18-Jan-2020 20:03:17
|

saif_1  H x W:ट्रेलर आवडला नसल्याची सैफची प्रतिक्रिया

मुंबई : कार्तिक आर्यन आणि सारा अली खानच्या बहुचर्चित 'लव आज कल' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. मात्र, प्रेक्षकांचा या ट्रेलरला फारसा प्रतिसाद मिळताना दिसला नाही. खुद्द साराचे वडील म्हणजेच अभिनेता सैफ अली खान यालाही हा ट्रेलर आवडलेला नाही. सैफने स्वत:च तसे मीडियाला सांगितले.


कार्तिक-साराचा हा चित्रपट म्हणजे २००९ मध्ये सुपरहिट झालेल्या
'लव्ह आज कल' चित्रपटाचा सिक्वल आहे. त्या चित्रपटात सैफ अली खान व दीपिका दुको यांच्या प्रमुख भूमिका होत्या. नव्या चित्रपटात नायक-नायिकेची जोडी बदलली आहे. सैफच्या भूमिकेत कार्तिक असून दीपिकाच्या भूमिकेत सारा झळकणार आहे. सारा आणि कार्तिकचा हा पहिलाच चित्रपट असल्याने त्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. हा ट्रेलर गोंधळात टाकणारा असल्याचे बोलत प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे.


सैफनेही ट्रेलरबद्दल नापसंती दर्शवत, 'मी ट्रेलर पाहिला. पण मला तो फारसा आवडलेला नाही. यापेक्षा आमच्या आधीच्या चित्रपटाचा ट्रेलर चांगला होता,' से म्हटले. यावेळी त्याने सारा आणि चित्रपटाच्या टीमला शुभेच्छाही दिल्या. सारा-कार्तिकचा ‘लव आज कल’ येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.