बॉलीवूड ’क्वीन’चा दीपिकावर हल्लाबोल!

    दिनांक  18-Jan-2020 17:57:56
|

deepika_1  H x


तुकडे-तुकडे गँगचे समर्थन करणाऱ्या दीपिकाचा कंगनाने घेतला समाचार

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत चित्रपट, फॅशनसह तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. मनोरंजन क्षेत्रापासून ते सामाजिक विषयांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर कंगना आपली मतं व्यक्त करत असते. दीपिकाच्या जेएनयु भेटीनंतर सगळ्याच क्षेत्रांतून तिच्यावर टीका होत असताना, कांगनानेही या वादात उडी घेत दीपिकाच्या या कृत्याचा निषेध केला.


‘दीपिकाला माहित आहे ती कोणासोबत उभी आहे आणि काय करत आहे. दीपिकाने काय करावं किंवा काय करू नये हे ठरवण्याचा हक्क तिला लोकशाहीने दिला आहे. त्यावर मी बोलणं योग्य नाही आणि तितका अधिकारही नाही.’ असं एका वेबसाईटला मुलाखत देताना कंगना म्हणाली.


‘इतरांनी काय केलं यावर बोलण्याचा अधिकार मला नाही, पण मला काय करायचं हे मी ठरवू शकते. तुकडे-तुकडे गँगचं समर्थन मी कधीच करणार नाही. काहीही झालं तरी तुकडे-तुकडे गँगचं समर्थन करणं योग्य नाहीच. देशाचे तुकडे करू इच्छिणाऱ्यांचं समर्थन चुकीचंच आहे. यामुळे अशांना मी पाठिंबा देणार नाही. आपले जवान शहीद झाल्यावर जे लोक सेलिब्रेशन करतात, अशांचा मी विरोधच करते, असं म्हणत कंगनाने दीपिकाला टोला लगावलाय.


तर या प्रकरणामुळे दीपिकाच्या चित्रपटावर सोशल मीडियातून बहिष्कार घालणे चुकीचे असल्याचे म्हंटले. मात्र चित्रपटाची कथा दमदार असेल तरच चित्रपट चालतो असं म्हणत तिने दीपिकाला कोपरखळी दिली. यापूर्वीही कंगनाने जेएनयुविरोधात आवाज उठवला होता.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.