निर्भायाच्या गुन्हेगाराला ‘दया’ नाहीच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2020
Total Views |

nirbhaya_1  H x


राष्ट्रपतींनी फेटाळली आरोपीची दया याचिका

नवी दिल्ली : निर्भया प्रकरणात फाशीसाठी दोषी ठरविण्यात आलेल्या मुकेश सिंग याची दया याचिका शुक्रवारी राष्ट्रपतींनी फेटाळून लावली आहे. ही दया याचिका यापूर्वी गृहमंत्रालयाने राष्ट्रपतींकडे पाठवली होती. दरम्यान, गुरुवारी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी मुकेश याची दया याचिका फेटाळण्यात यावी, अशी शिफारस केली होती.


त्याआधी दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी मुकेश याची दया याचिका फेटाळून लावली होती. या प्रकरणात, मुकेश याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याने खालच्या न्यायालयातील डेथ वॉरंट फेटाळण्याची मागणी या याचिकेद्वारे केली होती.


सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर आरोपींनी फाशीपासून बचाव व्हावा म्हणून अखेरचा मार्ग म्हणून सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ही याचिका अर्थात सुधारणा याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटळली होती. त्यानंतर मुकेश या दोषीने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. तेथेही त्याला अपयश आले आहे. त्यामुळे त्याची फाशी कायम राहणार आहे.


निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी विनय कुमार आणि मुकेश यांनी दाखल केलेल्या गुणात्मक याचिका सर्वोच्य न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावल्या होत्या. या दोषींनी ट्रायल न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावल्याबद्दल याचिका दाखल केली होती. ट्रायल न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर नंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली होती.


सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्याने विनय कुमार शर्मा, मुकेश सिंग यांच्यासह चारही आरोपींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येणार आहे. मंगळवारी ७ जानेवारी रोजी पटीयाला न्यायालयाने चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी केले होते.

@@AUTHORINFO_V1@@