मुलांच्या मस्तीमुळे अनेकदा आईवडिलांना ‘अळीमिळी गुपचिळी’ करावी लागते : स्नेहलता वसईकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2020
Total Views |

snehlata_1  H x



झी मराठीवरील अळीमिळी गुपचिळीया नवीन कार्यक्रमासाठी आपले लाडके कलाकार त्यांच्या पाल्यांसह तयार झाले आहे. लहानांची मोठ्यांना कोपरखळी असलेला हा धमाल शो 'अळीमिळी गुपचिळी' १७ जानेवारी पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांच्यासह या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे अभिनेत्री स्नेहलता वसईकर. या निमित्ताने त्यांच्यासोबत साधलेला हा खास संवाद...



  • अळीमिळी गुपचिळी या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल?

 अळीमिळी गुपचिळी हा एक फॅमिली चॅट शो आहे, ज्यामध्ये कुटुंबातील लहान मुलांना जास्त प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांचे विचार, त्यांच्या आवडीनिवडी, गमतीजमती हे सगळं प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. लहान मुलांच्या धमाल मस्तीमुळे कशी अनेकदा आईवडिलांना अळीमिळी गुपचिळी करावी लागते हे प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळेल.



  • अतुल परचुरे आणि अर्णव काळकुंद्री यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

 या दोघांसोबत माझ्या रॅपो पाहिल्या दिवसापासूनच खूप चांगला आहे. अतुल दादा हा खूप अनुभवी कलाकार आहे, त्यामुळे तो ट्रिकी सिच्युएशनसुद्धा एकदम सहज रित्या सांभाळतो. अर्थात तो लहान मुलांचा लाडका मोहन दादा आहे, त्यामुळे तो कोणाशीही पटकन जुळवून घेतो. मला एक मुलगी आहे आणि अर्णव अगदी तिच्या सारखाच आहे त्यामुळे त्याचे मी सतत लाड करते आणि आमची खूप छान गट्टी जमली आहे.



  • तुम्हाला कधी तुमच्या मुलीने कोपरखळी दिली आहे का?

 शौर्याने मला अनेकदा कोपरखळी दिली आहे, किंबहुना ती रोजच देते. तिचा स्वभाव मुळातच खूप मिश्किल आहे. शौर्याने पहिली कोपरखळी तिच्या जन्माच्या पहिल्याच दिवशी दिली होती. जेव्हा तिचे वडील तिला हातात घ्यायला गेले तेव्हा तिने तिच्या वडिलांना डोळा मारला होता. ही शौर्याची पहिली कोपरखळी होती.



  • या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात घडलेला एखादा मजेशीर किस्सा...

 चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी खूप मजेशीर किस्से घडले. आम्ही खूप लहान मुलांसोबत शूटिंग केलं. त्यातील अनेक मुलं बोलकी होती, काही शांत होती, काही चंचल होती. मुलांसोबत त्यांच्या कलेने घेऊन चित्रीकरण करणं हे सोपं नव्हतं, आमची खूप भंभेरी उडाली पण त्यातही एक मजा होती आणि ती मजा आता प्रेक्षकदेखील या कार्यक्रमातून अनुभवतील.

@@AUTHORINFO_V1@@