मराठमोळे हरीश साळवे आता ब्रिटनच्या महाराणीचे वकील!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2020
Total Views |

harish_1  H x W



कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठी क्वीन काऊंसिल म्हणून काम पाहणार

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची बाजू भक्कमपणे मांडणारे मराठमोळे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची थेट ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. ब्रिटनच्या न्याय मंत्रालयाने नुकतीच नव्या नियुक्त्या संदर्भातील यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये हरीश साळवे यांच्या नावाचा समावेश आहे. हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीसाठी कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे क्वीन काऊंसिल म्हणून काम पाहतील. १६ मार्च रोजी हरीश साळवे यांची अधिकृतपणे नियुक्ती होणार आहे. ब्रिटिश सरकारच्या माहितीनुसार, महाराणीने ११४ वकिलांना क्वीन काऊंसिलपदी नियुक्त केले आहे. इंग्लंड आणि वेल्सच्या न्यायालयांसाठी महाराणीचे वकील (QC) म्हणून हरीश साळवे यांना नियुक्त करण्यात आली असून, ब्रिटिश महाराणीकडून हे पद वकिलांचे विशेष कौशल्य पाहून प्रदान करण्यात येते.


आंतरराष्ट्रीय पातळीवर हरीश साळवे यांच्या नाव प्रसिद्ध आहे. १९८० मध्ये त्यांनी वकिली सुरू केली. हरीश साळवे यांची १९९२ मध्ये दिल्ली हायकोर्टा
ने ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती केली. १९९९ ते २००२ पर्यंत त्यांनी देशासाठी सॉलिसिटर जनरल म्हणून काम केले. या दरम्यान त्यांनी देश-विदेशातील मोठ-मोठी प्रकरणे मोठ्या हुशारीने सांभाळली.


२०१९ साली आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची बाजू हरीश साळवेंनीच मांडली होती. या प्रकरणात पाकिस्तानला त्यांनी तोंडावर पाड
ले. परंतु उल्लेखनीय म्हणजे या केससाठी त्यांनी नाममात्र एक रुपया फी म्हणून घेतली होती. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी निधनापूर्वी केवळ एक दिवस अगोदर हरीश साळवे यांना फोन करून आपली फी घेऊन जाण्याची विनंती केली होती.

@@AUTHORINFO_V1@@