संजय राऊतांची सर्व पदे काढून घ्या : संभाजी भिडेंची मागणी

    दिनांक  17-Jan-2020 11:51:42
|


saf_1  H x W: 0


सांगली : राज्यामध्ये संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे १३वे वंशज उदयनराजे भोसले यांच्याविरोधात वक्तव्य केल्यानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांना विरोध करण्यात आला. गुरुवारी सातारा येथे कडकडीत बंद पाळल्यानंतर आता शुक्रवारी सांगलीमध्येही शिवप्रतिष्ठानने बंदची हाक दिली आहे. यामध्ये सांगलीला बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांगलीला भेट देणार आहेत. यावेळी संजय राऊत यांची सर्व पदांवरून हकालपट्टी करा अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे.

 

शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी, "छत्रपती परंपरा ही हिंदुस्थानची प्राणभूत परंपरा आहे. या परंपरेचा वा वंशजांचा अवमान म्हणजे देशाचा अवमान आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पदावरून हाकला." अशी मागणी केली आहे. तसेच हा बंद शिवसेना किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध नसून हा बंद फक्त संजय राऊत यांच्याविरुद्ध आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.