फरार कुख्यात दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2020
Total Views |


dr bomb_1  H x



नवी दिल्ली : कुख्यात दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक करण्यात आली आहे. पॅरोलवर असताना जलीस अन्सारी मुंबईतून फरार झाला होता. त्याला आता पोलिसांनी कानपूरमधून अटक केली आहे. ५०पेक्षा जास्त बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग होता. त्यामुळे त्याला डॉ.बॉम्ब असेही संबोधीत केले जाते. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातही त्याचा सहभाग होता.



देशातील अनेक साखळी बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात दोषी ठरलेला ६९ वर्षीय जलीस अन्सारी गुरुवारी सकाळी मुंबईतील आपल्या घरातून बेपत्ता झाला होता. १९९३च्या राजस्थान बॉम्बस्फोट प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्याला २१दिवस पॅरोल दिला होता. बेपत्ता होण्याच्या एक दिवस अगोदरच त्याची पॅरोलची मुदत संपणार होती. अन्सारीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार केली होती. अन्सारी गेल्या महिन्यात पॅरोलवर अजमेर कारागृहातून बाहेर आला होता. ज्याचा कालावधी शुक्रवारी संपणार होता. अन्सारी बेपत्ता झाल्याने सुरक्षा यंत्रणांची मोठी कोंडी झाली होती.



महाराष्ट्र एटीएस
, मुंबई गुन्हे शाखेसह इतर एजन्सीसुद्धा अन्सारीचा शोध घेत होत्या. गुरुवारी सकाळी तो मुंबई सेंट्रलमधील मोमीनपुरा येथून बेपत्ता झाला,असे त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले. पेशाने एमबीबीएस डॉक्टर अन्सारी हे १९९४पासून तुरूंगात होते. राजधानी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब लावण्याच्या भूमिकेसाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने(सीबीआय) त्याला अटक केली होती. दरम्यान बेपत्ता झाल्यानंतर त्याला कानपुर येथून अटक करण्यात आली.

@@AUTHORINFO_V1@@