मुंबईतील नाईट लाईफ २७ जानेवारीपासून सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2020
Total Views |


nightlife_1  H

 

मुंबई : रात्रंदिवस जागते शहर म्हणून ओळख असणार्‍या मुंबई शहरात प्रजासत्ताक दिनाच्या दुसर्‍या दिवसापासून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील नाइट लाइफ सुरू होत आहे. रहिवासी वसाहती नसलेल्या ठिकाणी मॅाल, दुकाने, हॉटेल्स २४तास खुली ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत नाइट लाइफ निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पोलिस आयुक्त संजय बर्वे तसेच शॅापिंग मॅाल्स, हॉटेल, रेस्टॅारन्टचे प्रतिनिधीही उपस्थित होते.



नाईट लाईफ ही शिवसेनेचे नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची संकल्पना आहे
. २०१३ सालापासून याबाबत विचार सुरु आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून हे शहर २४ तास जागे असते. त्यामुळे विविध प्रकारच्या जीवनावश्यक बाबींची नागरिकांना आवश्कता असते. ही बाब लक्षात घेऊन हॉटेल्स, मॅाल्स जीवनावश्यक गोष्टींची दुकाने, हॉटेल्स दिवस-रात्र सुरू ठेवल्यास पर्यटक आदींची सोय होऊ शकेल. रोजगार निर्मिती करणे, पर्यटन वाढवणे हा उद्देश यामागे आहे.



वर्षभरापूर्वी सरकारने नाइट लाइफची अधिसूचना जारी केली होती
. मात्र कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे ती प्रत्यक्षात येत नव्हती. गुरुवारी झालेल्या बैठकीत नाईट लाईफला परवानगी देण्यात आली. त्यामुळे शहरात नाईट लाईट सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रहिवासी वसाहत नसलेल्या ठिकाणी नाईट लाईफला परवानगी देण्यात आली आहे. मात्र मद्यपानला परवानगी देण्यात आलेली नाही. रात्रीची आस्थापना सुरु ठेवण्यासाठी सेवांचे नियमन, अटी तयार करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे.



मॉल रात्रभर उघडे राहणार


वरळीतील अ
ॅट्रिया मॅाल, घाटकोपरमधील आरसीटी मॅाल, गोरेगावमधील ऑबेरॉय मॉल, फिनिक्स आदी २५ मॅाल्समध्ये नाईटलाईफसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच शहरातील अनेक दुकाने, रेस्टॅारन्ट आदी आस्थापने २४ तास उघडी ठेवता येणार आहेत. या ठिकाणी पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मात्र यामध्ये मद्यपान करण्यास परवानगी नसेल. व्यवसायातील फायद्याच्यादृष्टीने आठवडाभर २४ तास उघडे ठेवायची की नाही, हा निर्णय त्यांच्या मालकांवर अवलंबून राहणार आहे. मुंबई महापालिका व पोलिसांनी शहरभरातील अशा आस्थापनांना २७ जानेवारीपासून परवानगी दिली आहे.


सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर


मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात नाईट लाईफ सुरु झाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे
. मात्र या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर राहणार आहे. वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही, यासाठी पार्किंगची सोय उपलब्ध असणार आहे. यामुळे शांतताभंग होणार नाही, यासाठी कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने विचार करून परवानगी देण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

@@AUTHORINFO_V1@@