मुंबई विद्यापीठाचा 'यु टर्न' ; योगेश सोमण सक्तीच्या रजेवर नाही ?

    दिनांक  17-Jan-2020 11:21:37
|


saf_1  H x W: 0

 


मुंबई : मुंबई विद्यापीठातील अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस् विभागातून योगेश सोमण यांना संचालकपदावरून सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर आता गणेश चंदनशिवे यांना प्रभारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्रचे विद्यार्थ्यांनी नाट्यशास्त्र विभागात असलेल्या गैरसोयी विरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर ही कारवाई केल्याचे विद्यापीठाने सांगितले होते. पंरतु आता यावर विद्यापीठाने यु टर्न घेत सोमण हे तर सुट्टीवर असल्याचे अभाविपला लेखी सांगितले.

 
 
 
 

अनुभव नसलेले शिक्षक, विना लेक्चर्स अभ्यासक्रम पूर्ण करणे, कोणतेही सोयीसुविधा नाट्यशास्त्र विभागात नसणे आणि विद्यार्थी विरोधी वातावरण तयार झाल्याने नाट्यशास्त्र विभागात असलेल्या गैरसोयी विरोधात विभागातील काही विद्यार्थ्यांनी आवाज उठवला होता. त्यानंतर अखेर सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला होता. नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याचे पत्र रजिस्ट्रार अजय देशमुख यांनी काढले होते.

 

saf_1  H x W: 0 
 

१३ जानेवारी २०१९ रोजी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना रात्री ११.३० वाजता सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवत असल्याचे पत्र कुलसचिवांनी दिले होते. मात्र आता योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले नसून, त्यांनी आधीच रजेचा अर्ज केला होता आणि तो मान्य करण्यात आला असल्याचे मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या या युटर्नवर सर्वच अधिकारी, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आणि संघटनांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.