मुंबई गारठली ! राज्यात सर्वात कमी २ अंश तापमान

    दिनांक  17-Jan-2020 09:40:56
|


saf_1  H x W: 0


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रामध्ये निच्चांकी तापमानाची नोंद झाली. मुंबईमध्ये शुक्रवारी मौसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे पहाटे ५ वाजता मुंबईमध्ये १२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अचानक वाढलेल्या या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला.

 

नाशिकमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. निफाडमध्ये सर्वात कमी २.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.नाशिकमध्ये या मोसमातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद आज झाली असून, नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात पारा ५ अंशावर जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच वेण्णा लेकवर तापमान २ अंशावर घसरले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.