‘तान्हाजी’ : धैर्यवान योद्ध्याची शौर्यगाथा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2020
Total Views |


tanaji_1  H x W



छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. त्यासाठी त्यांच्याकडे अनेक मोठे पराक्रमी योद्धे, सुभेदार, शिलेदार होते. सर्वांच्या मनात स्वराज्य स्थापन करायचे होतेच. औरंगजेबाला दख्खनवर विजय मिळवायचा होता. त्याने मिर्झा राजे यांना हाताशी धरून शिवाजी महाराजांकडून तहाच्या अटीमध्ये २३ किल्ले मागून घेतले. त्यामध्ये कोंढाणा किल्लासुद्धा होता.



सुभेदार तान्हाजी मालुसरे या पोलादी पुरुषाची शौर्यगाथा
‘तान्हाजी’ या चित्रपटातून उत्तमपणे सादर केली गेली आहे. तान्हाजी मालुसरे मनाने खंबीर, उत्तम योद्धा, धैर्यवान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा निस्सीम भक्त, देशावर प्रेम करणारा, स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारा एक महान योद्धा असा होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. त्यासाठी त्यांच्याकडे अनेक मोठे पराक्रमी योद्धे, सुभेदार, शिलेदार होते. सर्वांच्या मनात स्वराज्य स्थापन करायचे होतेच. औरंगजेबाला दख्खनवर विजय मिळवायचा होता. त्याने मिर्झा राजे यांना हाताशी धरून शिवाजी महाराजांकडून तहाच्या अटीमध्ये २३ किल्ले मागून घेतले. त्यामध्ये कोंढाणा किल्लासुद्धा होता. अत्यंत अभेद्य असा हा किल्ला असल्याने त्या किल्ल्याची देखभाल करण्यासाठी किल्लेदार म्हणून उदयभान याची निवड औरंगजेबने केली आणि त्याला कोंढाण्यावर पाठवले. त्याच्या सोबत मोठी फौज दिली. शिवाय एक भली मोठी ‘नागीण’ नावाची तोफ दिली.



उदयभान किल्ल्याकडे निघाला
. तो कोणत्या मार्गाने येईल, याची कल्पना सुभेदार तान्हाजी मालुसरे यांना होती, पण फंदफितुरी झाली. उदयभान याने कोंढाण्याकडे जाण्याचा मार्ग बदलला आणि किल्ल्यावर दाखल झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोंढाणा घ्यायचा, आपल्या स्वराज्यामध्ये आणायचा हे ठरवले होतेच. त्यासाठी कोणाला मोहिमेवर पाठवायचे, याचा विचार करीत असताना त्यांना सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे नाव सुचले. पण तान्हाजीकडे त्याच्या मुलाचे लग्न असल्याने त्याला पाठवायचे नाही, असे महाराजांनी ठरवले. परंतु, त्याच वेळी तान्हाजी मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आमंत्रण देण्यासाठी गडावर आला. सोबत त्याचा मुलगा रायबा आणि पत्नी सावित्रीबाई, धाकटा भाऊ सूर्याजी आणि शेलारमामा होते. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या लक्षात आले की, कुठल्यातरी मोहिमेची तयारी सुरू आहे. त्याला पिसाळ सांगतो की, कोंढाणा किल्ला घेण्याची तयारी महाराज करीत आहेत आणि त्याचवेळी तान्हाजी कोंढाण्याच्या मोहिमेवर जाण्याचे पक्के करतो आणि तसे तो महाराजांना सांगतो. घरी सावित्रीबाई हिलासुद्धा सांगतो. चर्चा होते, पण शेवटी सुभेदार तान्हाजी मालुसरे कोंढाण्याच्या मोहिमेवर जाण्याचे पक्के करतो.



कोंढाणा किल्ला हा डोंगरी किल्ला आहे
. अभेद्य आहे. तेथे सहजपणे जाणे खूपच कठीण आहे. तेथे जाण्याचा मार्ग कोणता हे ठरवण्यापूर्वी उदयभान कसा आहे, हे त्याला पाहायचे असते. अत्यंत क्रूर अशा उदयभानची भेट कशी घ्यायची, हे ठरवून तो गडावर जातो. तेथून परत येताना त्याला किल्ल्यावर जाण्याचा मार्ग सापडतो. कारण, कोंढाण्याच्या पूर्वीच्या किल्लेदाराने काही खाणाखुणा सांगून ठेवलेल्या असतात. मग तयारी सुरू होते. कोणी, कुठे, कशा पद्धतीने जायचे, याची मसलत होते आणि काही ठराविक धाडसी मावळ्यांना घेऊन सुभेदार तान्हाजी निघतात. सोबत त्याचा धाकटा भाऊ सूर्याजी, शेलारमामा आणि स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणारे मावळे दोरखंडाच्या साहाय्याने अष्टमीच्या दिवशी काळोख्या रात्री गडावर हल्ला करतात. घनघोर युद्ध होते, पुढची कथा मी सांगत नाही, त्याचा तुम्ही अनुभव घ्या.



सुभेदार तान्हाजी मालुसरेची तडफदार व्यक्तिरेखा अजय देवगण याने अप्रतिमपणे सादर केली आहे
. युद्धकौशल्य उत्तमपणे सादर केले आहे. तान्हाजीच्या मनातले कुटुंबाविषयीचे विचार, स्वराज्याविषयीचे प्रेम, शिवाजी महाराज यांच्या विषयीचा आदर सारे काही छान व्यक्त केले आहे. संवादफेक उत्तम, देहबोली छान, सर्वच दृष्टीने भूमिका लक्षात राहते. सावित्रीबाईची अर्थात तान्हाजीच्या पत्नीची भूमिका काजोलने छान रंगवली आहे. देश आणि कुटुंब विषयीच्या भावना छान दाखविल्या आहेत. शेलारमामाची भूमिका शशांक शेंडे, सूर्याजीची भूमिका देवदत्त नागे, पिसाळची भूमिका अजिंक्य देव, यांनी मनापासून केलेली असून त्याला योग्य असा न्याय दिलेला आहे.



उदयभानची भूमिका सैफअली खान याने आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि देहबोलीने छान सादर केली आहे
. उदयभानचा क्रूरपणा, त्याची शिस्त इ. भावना त्यांनी उत्तम दाखवल्या आहेत. त्याचे युद्धकौशल्यही दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका शरद केळकर यांनी अत्यंत कौशल्याने रंगवली आहे. औरंगजेबच्या भूमिकेत लकी केणी आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी उत्तम केले असून चित्रपट सुरुवातीपासून प्रेक्षकांची पकड घेण्यास सुरुवात करतो. कुठेही चित्रपटाची गती कमी झालेली नाही. उत्तरोत्तर तो रंगत गेला आहे. चित्रपटाची निर्मिती अजय देवगणच्या ‘एडीफ’ आणि भूषण कुमार यांच्या ‘टी सिरीज’ने केली आहे. चित्रपटातील गाणी, साहस दृश्ये लढाईची दृश्ये छान टिपली आहेत. छायाचित्रण उत्तम, पार्श्वसंगीत हे चित्रपटाला पूरक असे आहे. एकंदरीत प्रत्येकाने ही ‘तान्हाजी’ची शौर्यगाथा पाहावी, अशीच आहे.



-दीनानाथ घारपुरे
@@AUTHORINFO_V1@@