सारा-कार्तिकच्या ‘लव आज कल’चा ट्रेलर प्रदर्शित

17 Jan 2020 17:51:59

sara_1  H x W:


१९९०-२०२० दोन कालखंडांची एक प्रेमकथा!

इम्तियाज अली दिग्दर्शित लव आज कल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान ही बहुचर्चित जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर काल प्रदर्शित झाल्यानंतर शुक्रवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.


अगदी सुरुवातीपासूनच लव आज कल हा चित्रपट चर्चेत आहे. मध्यंतरी या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आता कार्तिक साराची सिझलिंग केमिस्ट्री रिलीज झालेल्या या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. ही कथा वीर आणि जुईची आहे. सारा या चित्रपटात एका बिनधास्त मुलीच्या भूमिकेत तर कार्तिक एका थोड्याशा लाजऱ्या आणि गोंधळलेल्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. पण या व्यतिरिक्त या चित्रपटात आणखी एक अभिनेत्री दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार आहे.






करण जोहरच्या चॅट शोमध्ये साराने कार्तिकला डेट करायची इच्छा बोलून दाखवल्यानंतर एका इव्हेंटमध्ये अभिनेता रणवीर सिंहने या दोघांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर या जोडीची लोकप्रियता लक्षात घेता इम्तियाज अली यांनी ‘लव आज कलसाठी त्यांची निवड केली, आणि या दरम्यान यांच्यातील जवळीक वाढलेली दिसून आली. याच काळात या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा ही चांगल्याच रंगल्या आहेत. १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हेलेंटाईनच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Powered By Sangraha 9.0