‘हिटमॅन’ने रचला नवा विक्रम!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2020
Total Views |

rohit_1  H x W:



मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरलाही टाकले मागे

राजकोट : भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून नवा विक्रम केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध राजकोट येथे सुरू असलेल्या सामन्यात रोहितने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने ७ हजार धावा करत हा नवा विक्रम रचला.


हिटमॅन रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने वनडे क्रिकेटमधील सर्वात वेगाने ७ हजार धावांचा विक्रम केला. वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने इतक्या वेगाने ७ हजार धावांचा टप्पा गाठला
नव्हता. या क्रमवारीत रोहितने दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हाशिम अमला आणि भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांनाही मागे टाकले.


रोहितने १३७व्या डावात ओपन म्हणून ७ हजार धावा पूर्ण केल्या. वनडेमध्ये ७ हजार धावा करण्यासाठी अमलाने १४७ डाव खेळले होते. तर सचिन तेंडुलकरने १६० डावात ही कामगिरी केली होती. वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्मा ९ हजार धावा पूर्ण करण्याच्या जवळ आहे. त्याने खालच्या क्रमांकावर देखील फलंदाजीकरत २ हजार धावा केल्या आहेत. रोहित २०१३ मध्ये वनडेमध्ये सलामीवीर म्हणून फलंदाजी करण्यास सुरूवात केली. माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने रोहितला खालच्या क्रमांकावरून थेट ओपनर म्हणून संधी दिली होती. वनडे क्रिकेटमध्ये ३ द्विशतक झळकावणारा रोहित हा एकमेव फलंदाज आहे.

@@AUTHORINFO_V1@@