सावरकरप्रेम हाच 'यांचा' गुन्हा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2020
Total Views |


anil deshmukh_1 &nbs


राहुल गांधींचा निषेध केल्याप्रकरणी सोमण यांच्यावर कारवाई : गृहमंत्री


मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना खडेबोल सुनावणाऱ्या मुंबई विद्यापीठाचे नाट्यशास्त्र विभागाचे संचालक व अभिनेते योगेश सोमण यांच्यावर कारवाई केल्याची माहीती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे विद्यापीठात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले आंदोलन हे का केले जात होते, हे आता स्पष्ट झाले आहे. योगेश सोमण यांच्यावर राजकीय सुडापोटीच ही कारवाई केली जात असल्याचे संचालक योगेश सोमण यांना पाठिंबा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.



योगेश सोमण यांना विद्यापीठाने २८ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवत कारवाई केली आहे. विद्यापीठात होणाऱ्या आंदोलनामागे राजकीय वरदहस्त असल्याचे यातून उघड होत आहे. राहुल गांधी यांनी जाहीर सभेत सावरकर यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरला होता. मात्र
, त्याबद्दल मी माफी मागणार नाही, असे म्हटले होते. नेमक्या याच वक्तव्याचा सावरकरप्रेमींकडून निषेध करण्यात आला होता. सोमण यांनीही या वक्तव्याचा निषेध करत राहुल गांधी यांना खडेबोल सुनावले होते. नेमक्या याच प्रकरणामुळे राजकीय सुडपोटी ही कारवाई केली जात असल्याचा आरोप आता विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.



कोण आहेत योगेश सोमण
?

अभिनेते योगेश सोमण मुंबई विद्यापीठातील नाट्यशात्र विभागातील संचालक पदावर आहेत. तब्बल ३५ वर्षे त्यांनी रंगभूमीची अविरत सेवा केली आहे. परंतु मागील आठवड्यांपासून त्यांना संचालक पदावरून हटविण्याकरिता विभागातील काही विद्यार्थ्यांना हाताशी धरत काँग्रेस पक्षाने राजकारण सुरु केले आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच सोमवारी काही विद्यार्थ्यांनी विभागातील गैरसोयीचा मुद्दा मांडत योगेश सोमण यांना संचालक पदावरून हटविण्यात यावे याकरित्या आंदोलन सुरु केले होते. परंतु यासर्व आंदोलनांमागे डाव्या विचारसणीच्या विद्यार्थी संघटनांचा हात असून विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन योगेश सोमण यांच्याविरोधात वातावरण तयार केले. या आंदोलननंतर व डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेच्या दबावाखाली विद्यापीठ प्रशासनाने संचालक योगेश सोमण यांना २८ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठिविले. यामागे मोठे राजकारण असल्याचे आता काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. परंतु यामुळे विभागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे विद्यार्थी सांगत आहे.

@@AUTHORINFO_V1@@