‘कॅप्टन विक्रम बत्रां’च्या भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रा!

    दिनांक  16-Jan-2020 16:57:04
|

sidhharth_1  H


अभिनेता सिद्धार्थच्या वाढदिवसानिमित्त ‘शेरशाह’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

मुंबई : कारगिल युद्धातील परमवीर चक्र विजेते शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित 'शेरशाह' चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमधील विक्रम बत्रांच्या भूमिकेतील सिद्धार्थचे चाहत्यांकडून कौतुक होते आहे.


सिद्धार्थ मल्होत्राचा आज ३५वा वाढदिवस आहे. याचनिमित्ताने आज त्याच्या आगामी 'शेरशाह'या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. सिद्धार्थच्या चित्रपटाचा हा फर्स्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असून सिद्धार्थचा हा वेगळा अंदाज आज चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

विक्रम बत्रांच्या दराऱ्यामुळे पाकिस्तानी सेनेने त्यांना 'शेरशाह' हे कोडनेम दिले होते. चित्रपटाचे नावही त्यांच्या याच नावावरुन ठेवण्यात आले आहे. जून १९९९ मध्ये त्यांच्या पहिल्या तुकडीला कारगिल युद्धासाठी पाठवण्यात आले होते. युद्धादरम्यान केलेल्या यशस्वी कामगिरीनंतर त्यांना 'कारगिलचा शेर' असेही संबोधले गेले.


या
चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली असून, दिग्दर्शन विष्णुवर्धन यांनी केले आहे. सिद्धार्थ मल्होत्रासह या चित्रपटात कियारा आडवाणी, परेश रावल, जावेद जाफरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ३ जुलै २०२० रोजी 'शेरशाह' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.