गाढवांच्या गळ्यात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांच्या पाट्या

    दिनांक  16-Jan-2020 11:54:38
|


saf_1  H x W: 0

 


संजय राऊतांची 'त्या' मुलाखतीने साताऱ्यात पडसाद


सातारा : सध्या शिवाजी महाराज यांच्यावर चाललेल्या राजकारणाचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात दिसत आहेत. त्यात संजय राऊत विरुद्ध शिवाजी महाराजांचे वशंज यांच्या वाक् युद्ध सुरु आहे. संजय राऊत यांच्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील त्यांच्यावर टीका केली. यांच्याविरोधात उदयनराजे भोसले यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत.

  

अधिक माहितीसाठी हेही वाचा...

 
 

गाढवांच्या गळ्यात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावाच्या पाट्या अडकवून उदयनराजे समर्थकांचे निषेध आंदोलन सुरू केले आहे. उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी गुरुवारी सातारा बंदची हाक दिली आहे. पोवई नाका चौकात गाढवांची धिंड काढून संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे.

 
 

नुकतेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली. उदयनराजे यांनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत, असे डिवचल्यानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रत्युत्तर देत 'महाराजांवर चाललेले गलिच्छ राजकारण थांबवा' असे आव्हानही केले आहे. त्यानंतरही संजय राऊत यांनी आपल्या शाब्दिक बाणांचा मारा चालूच ठेवला.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.