संजय राऊतांच्या विरोधात आता संभाजी भिडेंकडून सांगली बंदची हाक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0

 

सांगली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगली बंदचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी १७ तारखेलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांगली दौऱ्यावर जाणार आहेत.

 

संजय राऊतांनी उदयनराजेंबद्दल वक्तव्य करुन देशाचा अपमान केला आहे. हा अपमान छत्रपती परंपरेचा अपमान आहे, असे आम्ही मानतो. या निषेध म्हणून १७ जानेवारीला सांगली बंद राहील.असे संभाजी भिडे यांनी सांगितले. संजय राऊत यांना पदावरुन हटवावे अन्यथा बंद यापुढेही कायम राहील असा इशाराही संभाजी भिडे यांनी दिला आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३वे वंशज उदयनराजे भोसले यांनी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावे, असे वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. यावर महाराजांचे वंशज उदयनराजे, शिवेंद्रराजे आणि संभाजीराजे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका गेले काही दिवस सुरु आहे. बुधवारी साताऱ्यामध्ये उदयराजे समर्थकांनी गाढवावर संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या पाट्या गळ्यात बांधून गाढवाची धिंड काढली. तसेच, त्यांनी सातारा बंदचेदेखील आवाहन केले होते. दुसरीकडे मराठा समाज संस्थेनेदेखील त्यांचा विरोध केला.

@@AUTHORINFO_V1@@