उलगडणार सारा-कार्तिकच्या प्रेमाची कथा!

    दिनांक  16-Jan-2020 16:21:10
|

sara_1  H x W:बहुप्रतीक्षित ‘लव आज कल’चे पोस्टर प्रदर्शित


मुंबई :
अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन ‘लव आज कल’च्या शुटींग दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा रंगत होत्या. चाहत्यांना त्यांच्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता होतीच, नुकतेच या चित्रपटाचे नवेकोरे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. पण आता पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. सारा अली खान आणि कार्तिक आर्यनची जोडी ‘लव आज कल’च्या या पोस्टरमध्ये जबरदस्त दिसत आहे. चाहते या पोस्टर चांगला प्रतिसाद देत आहे. पहिल्यांदा या नव्या जोडीला एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे.
दिग्दर्शक करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण'मध्ये अभिनेत्री सारा खानने तिच्या मनात असलेली गोष्ट सर्वांशी शेअर केली होती. तिला कार्तिक बरोबर डेटवर जायची इच्छा तिने व्यक्त केली होती. त्यानंतर इम्तियाज अलीच्या 'लव आज कल' या आगामी चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कार्तिक आणि साराला एकत्र काम करण्याची संधी मिळली. २००९ मध्ये सैफ आणि दीपिका यांचा 'लव आज कल' हा चित्रपट आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती, हा या चित्रपटचा सिक्वेल असणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.