जयशंकर – झरीफ यांच्यात चर्चा ; आखाती क्षेत्रातील परिस्थितीची आढावा बैठक

16 Jan 2020 18:39:11


zarin jaishankar_1 &



नवी दिल्ली : अमेरिका – इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री जावेद झरीफ यांच्या चर्चा केली. यावेळी जयशंकर यांनी झरीफ यांच्याकडून आखाती क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीचा आढावा घेतला. इराणचे परराष्ट्र मंत्री पाचव्या रायसीना डायलॉगसाठी भारतात आले आहेत.



इराणच्या सैन्याचे कमांडर कासीम सुलेमानी यांची अमेरिकेने हत्या घडवून आणल्यानंतर दोन्ही देशात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम संपूर्ण आखाती क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. त्याविषयी जयशंकर आणि झरीफ यांच्यात चर्चा झाली. यावेळी झरीफ यांनी अमेरिका – इराण संघर्ष, आखाती क्षेत्रात निर्माण झालेला तणाव आणि इराणचे नेमकी भूमिका याविषयी सविस्तर माहिती जयशंकर यांनी दिली. त्याचप्रमाणे चाबहार बंदर आणि भारत – इराणदरम्यानचे द्विपक्षीय विषय यावरदेखील दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा झाली.




Powered By Sangraha 9.0