दाऊदच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रात सरकार चालतं होत का ? : फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2020
Total Views |


congress_1  H x



मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल एका कार्यक्रमामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या करीम लाला याला भेटायच्या असे विधान केले होते. त्यावरुन विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाण साधला. 'शिवसेनेच्या मुख्य नेत्यांपैकी एक असणारे खासदार संजय राऊत यांनी केलं केलेला खुलासा धक्कादायक आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची गुन्हेगारांबरोबर उठबस असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जनतसमोर याबद्दल खुलासा करावा', अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.



"
काँग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का? अंडरवर्ल्डच्या प्रमुखाला भेटण्यासाठी इंदिराजी येत होत्या का ?. जर अशा भेटी होत होत्या तर काँग्रेस अशा अंडरवर्ल्ड डॉनच्या ताकदीवर निवडणूक जिंकत होती का ?१९६० ते १९८०च्या दशकात मुंबईत पोलीस कमिशनरची नियुक्ती अंडरवर्ल्ड डॉनच्या म्हणण्यानुसार होत असे असा ही एक खुलासा समोर आला आहे, याबाबत काँग्रेसने स्पष्टीकरण दिले पाहिजे.यापेक्षा जास्त बदनामीकारक काही असू शकत नाही." असे फडणवीस म्हणाले.



पुढे फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केला कि
,"काँग्रेसच्या कार्यकाळातील मोठे खुलासे यानिमित्ताने समोर येत आहेत. दाऊद, छोटा शकील हे महाराष्ट्रातील राज्य चालवायचे मुंबईतील राज्य चालवायचे, हे खरं आहे का? याचा खुलासा काँग्रेसने करावा. तसेच राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची सुरुवात महाराष्ट्रात देशात याच काळात झाली का ? याचेही स्पष्टीकरण करावे, असे फडणवीस म्हणाले.



तसेच ते पुढे म्हणाले कि
, "सोनिया गांधी , राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे संजय राऊत यांच्या या वक्त्यव्याचे समर्थन करतात कि याबाबत खुलासा करणार आहेत हे त्यांनी जनतेसमोर सांगावं. आपल्या मुख्य नेत्यावर इतका मोठा आरोप होऊनही महाराष्ट्रातील किंवा देशातील कोणताही प्रमुख नेता याविषयी खुलासा करायला किंवा निषेध करायला समोर येत नाही ही आश्चर्याची बाब आहे." संजय राऊत यांनी कालच्या आपल्या कार्यक्रमात दाऊद इब्राहिमचे नाव घेतले होते. अंडवर्ल्डच्या या गुन्हेगारांमुळेच मुंबईवर हल्ले झाल्याची आठवण फडणवीस यांनी करुन दिली.




@@AUTHORINFO_V1@@