सत्ताधाऱ्यांची दादागिरी ! काँग्रेस नगरसेवकाची महिला पत्रकारांशी गैरवर्तवणूक

16 Jan 2020 15:05:32


saf_1  H x W: 0

 


ठाणे : महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून मंत्र्यांचे नाराजी नाट्य आणि आता दादागिरीचे बरेच किस्से लोकांसमोर येत आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचे बंधू नगरसेवक कप्तान मलिक यांच्या प्रतापानंतर आता आणखी एका नगरसेवकाची दादागिरी समोर आली आहे. ठाण्यातील ओव्हाळ माजिवडा विभागाचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी एका महिला पत्रकारांशी असभ्य वर्तन केल्याचा एक विडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. 

 
 
 

संबंधित महिला ही प्रतिष्ठित प्रसिद्ध वृत्त संस्थेशी निगडित असून तिने हा व्हिडियो ट्विट करत अनेक सवाल उपस्थित केले आहे. त्यामुळे आता यांच्यावर काय कारवाई होणार? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. ठाण्यातील या प्रकारामुळे आता पत्रकारांच्या सुरक्षेचाही मोठा प्रश्न उभा राहिला आहे. हा सर्व प्रकार मेट्रो स्टेशनवर घडल्याचे त्या पत्रकाराने सांगितले आहे. 

 
 

नक्की काय घडले ?

 

नगरसेवक विक्रांत चव्हाण हे शांतता श्रेत्रात मोठ्या आवाजात बोलत होते. तेव्हा संबंधित महिला पत्रकार घडत असलेल्या घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी तिथे काम करत असलेल्या कर्मचाऱ्याला 'काय प्रकार आहे' असे विचारत होती. तेव्हा नगरसेवक विक्रांत चव्हाण अजून मोठ्या आवाजात बोलायला लागले, "तू जा यहा से, मैं विक्रांत चव्हाण हूँ, कॉर्पोरेटर” हे बघताच महिला पत्रकाराने व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला आणि चव्हाण हिंसक झाले. व्हिडिओ थांबवण्यासाठी त्यांनी महिला पत्रकारावर हात उचलताना त्यांच्या हातावर फटका मारला. हा व्हिडियो ट्विट करत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर कारवाई करणार का? असा प्रश्नदेखील उपस्थित केला आहे.

Powered By Sangraha 9.0