अतुल परचुरेंची 'अळीमिळी गुपचिळी'

    दिनांक  15-Jan-2020 10:29:54
|

atul_1  H x W:लहानांची मोठ्यांना कोपरखळी 'अळीमिळी गुपचिळी'

 

मुंबई : आपण अनेक चॅट शो पाहिले आहेत, ज्यात कलाकार मंचावर येऊन दिलखुलास गप्पा मारतात. अशा कार्यक्रमांमधून कलाकारांचे विविध पैलू प्रेक्षकांच्या समोर येतात. पण झी मराठी प्रेक्षकांसाठी एक असा चॅट शो सादर करणार आहे, ज्यात कलाकार त्यांच्या मुलांसोबत सज्ज होतील. या कार्यक्रमाचे नाव आहे अळीमिळी गुपचिळी आणि या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहेत अभिनेता अतुल परचुरे. त्यांना साथ देण्यासाठी अभिनेत्री स्नेहलता वसईकर आणि चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल या पर्वाचा उपविजेता अर्णव काळकुंद्री देखील या कार्यक्रमाचा भाग असणार आहेत.


लहान मुलांना आपण नेहमी शिकवतो, की खोटं बोलल्यावर पाप लागतं. पण अनेकदा लहान मुलांच्या खरेपणामुळे आई-बाबा अडचणीत येतात. कलाकारांच्या बाबतीतही असे अनेक किस्से घडतात आणि हेच किस्से कलाकार अळीमिळी-गुपचिळीच्या मंचावरून सगळ्या प्रेक्षकांसोबत शेअर करणार आहेत. लहानांची मोठ्यांना कोपरखळी असलेला हा धमाल कार्यक्रम अळीमिळी गुपचिळी येत्या १७ जानेवारी पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चॅट शोमध्ये कलाकार आणि त्यांच्या मुलांमधील मिश्कील संवाद प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.