‘भुज-द प्राइड ऑफ इंडिया’च्या कलाकारांमध्ये मोठा बदल!

    दिनांक  15-Jan-2020 14:33:04
|

bhuj_1  H x W:

 


राणा दग्गुबातीच्या जागी शरद केळकरची वर्णी

मुंबई : 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारून आपल्याला अभिनयाने लोकप्रिय झालेला अभिनेता शरद केळकर लवकरच एका नवीन भूमिकेत दिसणार आहे. 'तान्हाजी' चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्यानंतर आता तो 'भुज- द प्राइड ऑफ इंडिया' चित्रपटामध्ये भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता राणा दग्गुबातीच्या जागी शरद केळकरची वर्णी लागली आहे.


राणा दग्गुबातीने त्याच्या तब्येतीमुळे चित्रपटातून माघार घेतली. त्यानंतर निर्मात्यांनी त्याच्या जागी शरदच्या नावाला पसंदी दिली आहे. तान्हाजी चित्रपटामध्ये छत्रपती महाराजांच्या भूमिकेला योग्य न्याय दिल्यानंतर तो आता
'भुज' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.


भुज चित्रपटामध्ये शरदला पुन्हा अभिनेता अजय देवगनसोबत भूमिका साकारता येणार असल्यामुळे तो फार खूश आहे.
'भुज हा चित्रपट ऍक्शन चित्रपट आहे. दरम्यान राणाला पूर्ण स्थिर होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे.' से वक्तव्य शरदने केले आहे.


राणाच्या आरोग्यामुळे अभिषेक यांनी मला चित्रपटाबद्दल विचारणा केली असल्याचे देखील
शरदने सांगितले. अभिषेक दुधैया यांच्या खांद्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आहे. चित्रपटात संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, परिणीति चोप्रा आणि एम्मी विर्क मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. गिन्नू खनूजा, वजिर सिंग, भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि अभिषेक दुधैया यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.