आयसीसी अवॉर्डमध्ये रोहित शर्माच 'हिट' ; तर कोहली कर्णधारपदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0

 


नवी दिल्ली : आयसीसीने नुकतेच २०१९ वर्षमध्ये खेळाडूंनी केलेल्या कामगिरीसाठी काही पुरस्कार जाहीर केले. यामध्ये भारतीय फलंदाज रोहित शर्माचा '२०१९चा सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटर' म्हणून सन्मान करण्यात आला. विश्वचषक स्पर्धेमध्ये केलेल्या कामगिरीमुळे त्याला हा पुरस्कार देण्यात आला.

 
 
 

भारताच्या रोहित 'हिटमॅन' शर्माने २०१९ या वर्षात एकदिवसीय सामन्यांमध्ये ७ शतक ठोकले. त्याने आयसीसी विश्वचषक २०१९ या स्पर्धेमध्येच ५ शतक केले होते. त्यामुळे त्याला या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. रोहितने विश्वचषक स्पर्धेमध्ये ९ सामन्यांमध्ये सर्वाधिक ६४८ धावा केल्या होत्या. यामध्ये ५ शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश होता.

 
 अधिक माहितीसाठी हेही वाचा
 
 

कसोटी आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडेच...

 

आयसीसीने जाहीर केलेल्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे सोपवण्यात आले आहे. या संघात रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांचादेखील समावेश आहे. याशिवाय वेस्ट इंडिजचा शे होप, पाकिस्तानचा बाबर आझम, न्यूझीलंडचा केन विलियम्सन, इंग्लंडचा बेन स्टोक्स व जोस बटलर (यष्टिरक्षक), ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क, न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट यांचाही समावेश आहे.

 
 
 

आयसीसीच्या कसोटी संघात विराट कोहलीसह मयांक अग्रवालने स्थान पटकावले आहे. या संघाचे नेतृत्वदेखील विराटकडे सोपवण्यात आले आहे. या संघात टॉम लॅथम, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, बीजे वॉटलींग, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नील वॅगनर, नॅथन लियॉन यांचा समावेश आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@