'या' अभिनेत्रीची छेडछाड; झाली ३ वर्षांची शिक्षा

    दिनांक  15-Jan-2020 16:27:34
|


asf_1  H x W: 0


मुंबई : अभिनेत्री झायरा वसीम या अभिनेत्रींसोबत विमानात छेडछाड केल्याप्रकरणी विकास सचदेवेला मुंबईच्या दिंडोशी न्ययालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश ए. डी. देव यांनी पोस्को अंतर्गत या प्रकरणाचा निकाल देत विकास सचदेवला दोषी ठरवले होते. अखेर ३ वर्षानंतर झायराला या प्रकरणी न्याय मिळाला आहे.

 

झायरा वसीमसोबत १० डिसेंबर २०१७ला विमानात छेडछाड झाली असल्याची माहिती तिने सोशल मीडियावरून दिली होती. 'विस्तारा एअरलाइन्स'च्या विमानातून दिल्ली- मुंबई प्रवास करताना बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीम हिच्यासोबत विकास सचदेव याने छेडछाड केली अशी तिने पोस्ट लिहिल्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई केली होती. त्यानंतर विकास सचदेव विरुद्ध विनयभंग आणि बालक अत्याचार प्रतिबंधक कलमांतर्गत (पॉस्को) गुन्हा दाखल केला होता. विकास हा त्याच्या घरात एकटा कमावता असल्यामुळे त्याला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्याचे वकील अदनान शेख यांनी केली होती.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.