संपलेल्या कथेपासून पुन्हा सुरु होणार ‘गो गोवा गॉन २’

    दिनांक  15-Jan-2020 17:35:44
|

goa_1  H x W: 0


‘गो गोवा गॉन’चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


मुंबई : २०१३मध्ये प्रदर्शित झालेल्या गो गोवा गॉनया चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल आठ वर्षानंतर म्हणजे मार्च २०१२ मध्ये गो गोवा गॉनया चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शितहोणार आहे. मॅडॉक फिल्म्सने ट्विटरद्वारे या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरु असल्याची माहिती दिली.


मॅडॉक फिल्म्सचे संस्थापक दिनेश विजान यांनी सांगितले की, ‘२०१३ पासून हा प्रवास सुरु झाला आहे. आणि या वेड्या प्रवासासह आम्ही परत आलो आहोत. चित्रपटाची जुनीच पात्र आणि पुढची कथा घेऊन आम्ही पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहोत. सध्या चित्रपटाच्या अंतिम संहितेवर काम सुरू असून सप्टेंबर २०२० पासून चित्रीकरणाला सुरूवात होईल.


२०१३
मध्ये आलेल्या गो गोवा गॉनच्या पहिल्या भागात सैफ अली खान, कुणाल खेमू, वीर दास, पूजा गुप्ता आणि आनंद तिवारी मुख्य भूमिकेत दिसले होते. पुढच्या भागातही हे कलाकार दिसणार का आणि नेमकी कथा काय असणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.