आलिया दिसणार ‘गंगुबाई’च्या भूमिकेत!

15 Jan 2020 12:46:26

alia_1  H x W:



‘गंगुबाई काठीयावाडी’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टची प्रसिद्धी दिवसागणिक वाढताना दिसत आहे. प्रत्येक चित्रपटांमध्ये वेगळ्या धाटणीच्या भूमिकेत झळकणारी आलिया पुन्हा एकादा नवी आणि तितकीच वेगळी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. दिग्दर्शक संजय लिला भंसाळी यांच्या गंगुबाई काठीयावाडी चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. कामाठीपुऱ्यामधील विशेष चर्चिल्या गेलेल्या गंगुबाई यांच्या जीवनावर चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.


आलिया भट्टचा या चित्रपटातील फर्स्ट लूक बुधवारी प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटामध्ये आलियाची ओळखद मॅडम ऑफ कामाठीपुरा' अशी करून देण्यात आली आहे. अगदी लहान वयात वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलेल्या गंगुबाईंच्या आयुष्या भोवती चित्रपटाची कथा फिरत आहे. हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.




आयुष्यात अनेक चढ-उतार असूनही इतर महिलांना मदत करण्यासाठी पुढे असलेल्या गंगुबाईंची अनेक कुख्यात गुंडांसोबत ओळख झाली होती. त्याच्या आयुष्याचे वास्तव चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांना अनुभवता येणार आहे.

 

Powered By Sangraha 9.0