काश्मीरमध्ये हिमस्खलनात तीन जवान शहीद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2020
Total Views |
JK _1  H x W: 0
 

अनेक घरे बर्फाखाली दबल्याची भीती



कुपवाडा : सलग दोन दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या हिमवादळात तीन जवान शहिद झाल्याचे वृत्त आहे. उत्तर काश्मीरमधील अनेक भागात हिमस्खलन झाले आहे. कुपवाड्यातील हिमस्खलनात दबून तीन जवान शहीद झाले. अद्याप एक जवान बेपत्ता आहे.

 

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ४८ तासांत सुरू असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. कुपवाडासह काही ठिकाणी हिमस्खलन झाले आहे. कुपवाडातील माच्छिल सेक्टर येथे बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने तीन जवान शहीद झाले. तर एक जवान बेपत्ता आहे.

 

हिमस्खलन झालेल्या भागात लष्कराने बचावकार्य सुरू केले असून अनेक जवानांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली आहे. कुपवाड्याशिवाय बांदीपोरा, गांदरबल इथंही हिमस्खलन झाले आहे. यामुळे अनेक घरे बर्फाखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत पाच जणांना वाचवण्यात आले. गुरेजमधील दासी बक्तुर इथे तीन घरे बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबली आहेत.



@@AUTHORINFO_V1@@