सेरेना विल्यम्सची ऑस्ट्रेलिया आगपीडितांना मदत

    दिनांक  14-Jan-2020 17:04:18
|

Serena_1  H x W


ओकलंड ओपन जिंकून मिळालेली रक्कम करणार दान!

मुंबई : अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने रविवारी ओकलंड ओपन ही स्पर्धा जिंकली. मुलीच्या जन्मानंतर सेरेना तब्बल दोन वर्षांनंतर टेनिस कोर्टवर परतली. आई झाल्यानंतरचा तिचा हा पहिलाच विजय आहे. ३८ वर्षीय सेरेनाने अमेरिकेच्याच जेसिका पिगुला हिचा ६-३, ६-४ असा सरळ सेट मध्ये पराभव करत विजयाचा किताब आपल्या नावे केला. या स्पर्धेत तिला मिळालेली ३१ लाख रुपये पारितोषिकाची रक्कम तिने ऑस्ट्रेलियातील आगपिडीत जनतेला देणार असल्याची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियात लागलेल्या वणव्यामुळे तेथील स्थानिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे ५० कोटी प्राण्यांचा जीव या आगीत गेला आहे. वेगवेगळ्या स्तरांतून मदतीचा ओघ सुरु असून, अनेक कलाकार ऑस्ट्रेलियाला मदत करत आहेत.
सेरेनाने मुलीच्या जन्मापूर्वी २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन किताब जिंकला होता. २३ ग्रँड स्लॅम विजेत्या सेरेनाचा सिंगल चँपियन करियर मधील ७१ वा किताब आहे. या बद्दल बोलताना सेरेना म्हणाते, मी दीर्घकाळ टेनिस खेळते आहे आणि मला जे आवडते ते मी करू शकते याचा मला सर्वाधिक आनंद आहे. २० जानेवारी पासून सुरु होत असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये सेरेना खेळणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.