सीमाभागांत पाकिस्तानी ड्रोनच्या घिरट्या

14 Jan 2020 19:36:45
Drone _1  H x W
 


सुरक्षादलांकडून शोधमोहिम सुरू


फिरोजपूर : भारत-पाक सीमाभागांत पाकिस्तानी ड्रोन घिरट्या घालत असल्याचे भारतीय सैन्यदलाच्या निदर्शनास आले आहे. फिरोजपूरच्या सीमावर्ती भागात एक ड्रोन टेहळताना दिसला. तरनतारण येथे दोन पाकिस्तानी ड्रोन दिसल्याचे वृत्त आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर बीएसएफच्या जवानांनी हे ड्रोन पाडण्यासाठी गोळीबार केला. मात्र, ते या हल्ल्यातून निसटले. या दोन्ही भागांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

 

फिरोजपूर येथे ड्रोन सीमाभागातील गाव टेंडीवाला येथे निदर्शनास आले आहे. सुरक्षा दलांकडून पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी पंजाबसहीत बऱ्याच राज्यांमध्ये सीमावर्ती भागांत ड्रोन निदर्शनास आले आहेत. ड्रोनच्या सहाय्याने हत्यारे आणि अंमलीपदार्थांची तस्करी केली जात असल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. तरनतारन येथे भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमाभागात रात्री १० वाजता ड्रोन दिसून आले. जवानांनी ड्रोन पाडण्यासाठी हल्ला केला मात्र, निसटण्यात ते यशस्वी झाले. जवानांनी सकाळी आ वाजल्यापासून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

Powered By Sangraha 9.0