ऑस्कर २०२० ची नामांकने जाहीर; भारताला अजून एक संधी

    दिनांक  14-Jan-2020 13:07:09
|

ocsar_1  H x W:कॅलिफोर्निया
: ९२ व्या अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात ऑस्कर पुरस्कारांची नामांकने जाहीर झाली आहेत. जगभरातले चित्रपटप्रेमी या पुरस्कारांची आतुरतेने वाट पाहत असतात. १० फेब्रुवारी रोजी हा ऑस्कर सोहळा रंगणार आहे.


यावर्षी क्विंटन टरँटिनोचा 'वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड' आणि टोड फिलिप्सचा 'जोकर' ऑस्करच्या स्पर्धेत सर्वात पुढे आहे. भारताकडून ऑस्करसाठी झोया अख्तरचा 'गली बॉय' हा चित्रपट पाठवण्यात आला होता. मात्र तो स्पर्धेबाहेर गेला आहे. परंतु भारताला या शर्यतीत अजूनही एक संधी आहे. शेफ ते फिल्ममेकर प्रवास करणाऱ्या विकास खन्नाचा 'द लास्ट कलर' हा पदार्पणातील चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे. अभिनेत्री नीना गुप्ता यांची यात प्रमुख भूमिका आहे. बेस्ट फिचर फिल्म कॅटेगरीत हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे.सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम दिग्दर्शन, सर्वोत्तम अभिनेता, ओरिजनल स्कोर, संकलन, सिनेमॅटोग्राफी, पटकथा अशा सात विभागांमधील नामांकनांमध्ये 'जोकर' ने बाजी मारली आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.