'खेलो इंडिया'मध्ये महाराष्ट्राचा दबदबा... अव्वल स्थानासहित गाठली 'शंभरी'

    दिनांक  14-Jan-2020 17:03:01
|


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : भारत सरकारने आयोजित केलेल्या 'खेलो इंडिया युवा क्रीडा' स्पर्धेमध्ये सर्व राज्यात महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले आहे. महाराष्ट्राच्या खात्यात २४ सुवर्ण, २९ रोप्य आणि ४७ कांस्य पदकासह एकूण १०० पदके जमा आहेत. तर दुसऱ्या स्थानी ६३ पदकांसह हरियाणा राज्य आहे. त्याचप्रमाणे ४४ पदकांसह दिल्ली राज्य तिसऱ्या स्थानी आहे.

 

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिस-या पर्वात नेमबाजी, ज्युदो, टेबल टेनिस आणि जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले. महाराष्ट्राच्या नेमबाजांनी अन्य खेळाडूंचा कित्ता गिरवताना सुवर्णपदकाने सुरवात केली. स्पर्धेच्या १० मी. एअर रायफल मुलांच्या १७ वर्षांखालील गटात ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलने सुवर्ण, तर २१ वर्षांखालील गटात कोल्हापूरच्या शाहू माने याने कांस्यपदक मिळविले. खेलो इंडियाच्या तिस-या पर्वात महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील गटातील आगेकूच अंतिम फेरीत हरियाणाने एकतर्फी रोखली. महाष्ट्राला कबड्डीत रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.