पाकिस्तानची भाषा बोलण्यातच काँग्रेसला रस- डॉ. संबित पात्रा

    दिनांक  14-Jan-2020 18:17:20
|

sambit_1  H x Wनवी दिल्ली
: भारतावर हल्ला आणि पाकिस्तानची बचाव हा काँग्रेसचा नेहमीचा खेळ आहे. पुलवामाच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उभे करून काँग्रेसने त्यांची खरी मानसिकता दाखवून दिली आहे. पाकिस्तानची भाषा बोलण्यातच काँग्रेसला नेहसी रस असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी पत्रकारपरिषदेत मंगळवारी केली.


जम्मू
काश्मीरमधील डीएसपी देवेंदर सिंग यांना दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. त्याविषयी काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहे. काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनी त्याविषयी वादग्रस्त ट्वीट करीत वादाला तोंड फोडले. त्यावर भाजपप्रवक्ते संबित पात्रा यांनी त्यास प्रत्युत्तर दिले.चौधरी यांनी एकापाठोपाठ तीन ट्वीट केले. पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवर संघावर हल्ला चढवित म्हटले की
, देवेंदरसिंग ऐवजी जर देवेंदर खान असता तर आरएसएसच्या ट्रोल रेजिमेंटच्या प्रतिक्रिया अतिशय तिखट राहिल्या असत्या. पुढच्या ट्वीटमध्ये त्यांनी काश्मिर खोऱ्यातील सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर अखेरच्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले की, पुलवामाच्या बिभत्स घटनेमागचे खरे गुन्हेगार कोण, असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. त्यामुळे यावर पुन्हा नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे त्यांनी ट्वीट्समध्ये नमूद केले.भाजपतर्फे प्रत्युत्तर देताना डॉ. पात्रा यांनी काँग्रेसवर पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की
, काँग्रेस पक्ष नेहमीच पाकिस्तानला क्लीनचीट देण्यात उत्सुक का असतो, याचे उत्तर त्यांनी देशाला द्यावे. यापूर्वी २६/११ चा हल्ला झाला, तेव्हासुद्धा हल्ल्याप्रकऱणी रा. स्व. संघाला दोषी ठरविण्याचा प्रयत्न काँग्रस नेते दिग्विजय सिंह यांनी केली होता. एवढेच नव्हे तर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघात एक डोसियर दाखल प्रस्तुत केल होते, त्यात सर्वांत वर राहुल गांधी यांचे नाव होते. काँग्रेसने दहशतवादास धर्माशी जोडण्याचे काम नेहमीच केले आहे, भगवा दहशतवाद हा शब्दही काँग्रेसनेच प्रचारात आणला आहे. पुलवामा हल्ला कोणी घडविला, याबद्दलही काँग्रेसच्या मनात शंका आहे. त्यामुळे पुलवामा हल्ला पाकिस्तानने नाही, तर कोणी घडविला हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी स्पष्ट करावे, असे पात्रा म्हणाले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.