'जाणते राजा' फक्त शिवाजी महाराजच ; उदयनराजेंचा शरद पवारांना टोला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2020
Total Views |

hgc_1  H x W: 0 


पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी शिवाजी महाराज यांच्यावर चाललेल्या वादावर टीका केली आहे. एक युगपुरुष जन्माला येतो, ते आमचे शिवाजी महाराज. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो,” असे यावेळी उदयनराजे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते

  

शिवसेनेने महाराजांच्या वंशजांनी राजीनामा द्यावे या त्यांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. 'शिवसेना' असे नाव देताना वंशजांना विचारले होते का ? असा सवाल यावेळी उदयनराजे यांनी विचारला. 'सोयीप्रमाणे वापर करायचा आणि सोयीप्रमाणे विसर पाडायचा हीच यांची लायकी,' अशा कठोर शब्दांत उदयनराजे यांनी शिवसेनेवर टीका केली. 'शिववडा' असे नाव ठेवता तेव्हा आदर कुठे जातो? वडापावला महाराजांचे नाव कसे काय दिले जाऊ शकते? अशी विचारणादेखील त्यांनी यावेळी केली.

 

शिवसेना भवनाचा फोटो दाखवत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी महाराजांच्या फोटोंच्या जागेवरुन त्यांनी टीका केली. 'यापुढे तोंडातून ब्र काढला तर ऐकून घेणार नाही. यांनी काहीही टीका करायची आणि उदयनराजेंनी ऐकून घ्यायची असे चालणार नाही,' अशी तंबी उदयनराजेंनी दिली. तसेच 'तुमच्या गलिच्छ राजकारणाचे खापर आमच्यावर फोडू नका. शिवरायांच्या विचारांचे अनुकरण सर्वांनी करावे. तसेच, पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज हेच एकमेव जाणते राजे आहेत.' असेदेखील त्यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@