२६ जानेवारीला 'अपाचे', 'चिनूक'ची पहिली परेड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2020
Total Views |
Apache Chinuk _1 &nb


एकूण ४५ विमाने घेणार उड्डाण


 

नवी दिल्ली : वायुदलाच्या ताफ्यात नव्याने सामाविष्ठ झालेल्या चिनूक आणि अपाचे या दोन्ही हेलिकॉप्टरची पहिली परेड २६ जानेवारी रोजी पार पडणार आहे. चिनूक हे ३५० किमी प्रतितास धावणारे हेलिकॉप्टर आहे, तर अपाचे सर्वात जास्त वेगाने उड्डाण घेणारे लढाऊ विमान आहे. वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन चिनूक विमान हे 'विक' रचनेत उड्डाण घेणार आहेत. तर पाच अपाचे विमान हे 'एरोहेड' रचनेमध्ये उड्डाण करणार आहेत.


हवाई परेडमध्ये एकूण ४५ विमाने उड्डाण घेणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४१ लढाऊ विमाने आणि चार हेलिकॉप्टरचा सामावेश असणार आहे. यात १६ लढाऊ विमाने, १० मालवाहू विमाने आणि १९ हेलिकॉप्टरचा सामावेश असणार आहे. ही परेड दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त एमआय १५ आणि व्ही-५ हेलिकॉप्टर
'व्हाय' रचनेत उड्डाण करणार आहे. चार हेलिकॉप्टर ध्रुव रचनेतउड्डाण करणार आहेत.


यानंतर तीन चिनूक
'विक' रचनेत उड्डाण भरेल. त्यानंतर सुखोई- ३० एमकेआय नेत्र रचनेत उड्डाण करेल. ग्लोबमास्टर ग्लोब रचनेत उड्डाण भरेल. या परेडमध्ये पाच जॅगवार, पाच मिग-२९ उड्डाण भरणार आहेत. जोधपूर एअरफोर्स स्टेशनहून 'त्रिशुल' रचनेत तीन सुखोई विमाने उड्डाण घेतील. सर्वात शेवटी राष्ट्रपती भवनाहून इंडिया गेटकडे सरळ उड्डाण करणार आहे. जमिनीपासून ६० ते तिनशे मीटर उंचारवर ही भरारी घेतली जाईल.


@@AUTHORINFO_V1@@