‘तान्हाजीं’ची गाथा प्रेक्षकांच्या पसंतीस

    दिनांक  13-Jan-2020 13:08:08
|

tanhaji_1  H xअवघ्या तीन दिवसांत ६३ कोटींची कमाई!

मुंबई : जेएनयु वाद दीपिकाला भलताच भोवला. दीपिका पदुकोणच्या 'छपाक' चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. जोरदार प्रमोशन होऊनही ‘छपाक’ची जादू बॉक्स ऑफिसवर कमी पडली. मात्र एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या या दोन चित्रपटांपैकी एक असलेल्या ओम राऊत दिग्दर्शित आणि अजय देवगण अभिनित ‘तान्हाजी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. सलग चौथ्या दिवशी मुंबईसह देशभरात ‘तान्हाजी’ चित्रपटाचे शो हाऊसफुल जात आहेत. तर, छपाकच्या खुर्च्या मात्र रिकाम्याच दिसत आहेत.


तान्हाजी’ प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १५.१० कोटींचा गल्ला जमवला. तर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळवत या चित्रपटाने शनिवारीदेखील २० कोटींची कमाई केली. सलग चौथ्या दिवशीही ‘तान्हाजी’ची ही जादू बॉक्स ऑफिसवर दिसली. आतापर्यंत या चित्रपटाने ६३ कोटींची कमाई केली असून, लवकरच हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा पार करेल असे चित्र दिसत आहे. तर ‘छपाक’ने मात्र आतापर्यंत २९ कोटींचीच कमाई केली आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.