सोशल मिडीयावर जॉन अब्राहमच्या नव्या लूकची चर्चा!

    दिनांक  13-Jan-2020 17:32:49
|

john_1  H x W:


‘मुंबई सागा’मध्ये जॉन पुन्हा एकदा दिसणार गँगस्टरच्या भूमिकेत


मुंबई
: संजय गुप्ता दिग्दर्शित 'मुंबई सागा' चित्रपटाचे पोस्टर सोमवारी प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमधून अभिनेता जॉन अब्राहमचा लूक प्रदर्शित करण्यात आला. पोस्टरमध्ये जॉन एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळतोय. कपाळावर टिळा, त्याची रोखलेली नजर यावरून तो पुन्हा एकदा गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार असल्याचे लक्षात येते. सध्या सोशल मीडियावर जॉनच्या या लूकची चांगलीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटात जॉनसह इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


'मुंबई सागा'मधून दिग्दर्शक संजय गुप्ता, १९८०-९०च्या दशकात मुंबईत झालेल्या गँगवॉरची कहाणी मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत. 'मुंबई सागा'मध्ये जॉन अब्राहम, इमरान हाशमीशिवाय इतरही अनेक मोठे कलाकार भूमिका साकारणार आहेत. जॅकी श्रॉफ, सुनिल शेट्टी, प्रतिक बब्बर, गुलशन ग्रोवर, रोनित रॉय आणि अमोल गुप्ते हे कलाकार रुपेरी पडद्यावर एकत्रित पाहायला मिळणार आहेत.


'मुंबई सागा'आधी संजय गुप्ता यांनी हृतिक रोशन आणि यामी गौतम स्टारर 'काबिल' चित्रपटा
चे दिग्दर्शन केले होते. संजय गुप्ता यांना गँगस्टर चित्रपटांचे मास्टर म्हंटले जाते. या आधी संजय गुप्ता यांनी 'कांटे', 'शूटआऊट ऍट वडाळा', 'शूटआऊट ऍट लोखंडवाला' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 'मुंबई सागा' १९ जून २०२० रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.