भारतीय महिला संघाचे नेतृत्व युवांकडे... महाराष्ट्राच्या 'या' लेकीकडे उपकर्णधारपद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2020
Total Views |


ewt_1  H x W: 0


नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकासाठी रविवारी महिला संघाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे संघामध्ये समाविष्ठ केलेल्या१५ खेळाडूंपैकी ९ खेळाडू हे २२ पेक्षा कमी वयाचे आहेत. या संघाच्या कर्णधारपदी हरमनप्रीत कौरची निवड करण्यात आली आहे. तसेच, स्मृती मांधनाकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय महिला संघाची कामगिरी ही उल्लेखनीय राहिली आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये संघ कधी कामगिरी करतो याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.

 

टी - २० विश्वचषकाचा पहिला सामना २१ फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी भारतीय संघ ३१ जानेेवारीपासून ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिका खेळणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे. तसेच, गेले काही वर्षांमध्ये भारतीय महिला संघाच्या कामगिरीमुळे अनेक चषक आपल्या नावे केली आहेत.

 

जाणून घ्या कसा आहे भारतीय महिला टी-२० संघ?

 

हरमनप्रीत कौर (कर्णधार) (३० वर्ष)

स्मृति मंधाना (उपकर्णधार) (२३ वर्ष)

शेफाली वर्मा (१५ वर्ष)

जेमिमा रोड्रिग्ज (१९ वर्ष)

हरलीन देओल (२१ वर्ष)

दीप्ति शर्मा (२२ वर्ष)

वेदा कृष्णमूर्ति (२७ वर्ष)

रिचा घोष (१६ वर्ष)

तानिया भाटिया (२२ वर्ष)

पूनम यादव (२८ वर्ष)

राधा यादव (१९ वर्ष)

राजेश्वरी गायकवाड़ (२८ वर्ष)

शिखा पांडे (३० वर्ष)

पूजा वस्त्राकर (२० वर्ष)

अरुंधती रेड्‌डी (२२ वर्ष)

@@AUTHORINFO_V1@@