आधी अजित पवारांवर कारवाई करा : जयसिंह मोहिते पाटील

12 Jan 2020 15:42:43

ajit_1  H x W:



सोलापूर : पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसमधून जयसिंह मोहिते पाटील गटाच्या सहा जिल्हा परिषद सदस्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षादेश डावलून भाजपला मतदान केल्याने या सहा सदस्यांचे निलंबन करण्यात आले आहे. हे सर्व जण मोहिते पाटील गटाचे आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी ही कारवाई केली.


मंगल वाघमोडे
, शीतलदेवी मोहिते पाटील, सुनंदा फुले, अरूण तोडकर, स्वरूपाराणी मोहिते पाटील, गणेश पाटील यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र जयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आधी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांच्यावर आधी राष्ट्रवादीने कारवाई करावी, असे आव्हान जयसिंह मोहिते पाटील यांनी दिले आहे.


याच बरोबर
अडीच वर्षांपूर्वी संजय शिंदे भाजपकडून जिल्हा परिषद अध्यक्ष झाले त्यावेळी कोणती कारवाई केली? यासोबतच दिपक साळुंखे यांचा पराभव करणाऱ्या राष्ट्रवादीच्या सदस्यांवर कारवाई झाली का?' असे सवाल जयसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

Powered By Sangraha 9.0