हिंदुत्व आणि वनवासी यांची वेगळी जोडणी करून रावणाला महत्त्व देण्याचा प्रकार अनाठायी : खा. डॉ. भारती पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2020
Total Views |

janjati_1  H x



खा. डॉ. भारती पवार यांचे प्रतिपादन




नाशिक :हिंदुत्व आणि जनजाती समाज यांची सोईनुसार वेगळीच जोडणी करून रावणाला काही संघटनाच्या माध्यमातून अनाठायी महत्त्व दिले जात आहे. जनजाती समाजाचे इतर अनेक मूलभूत प्रश्न असून त्यावर लक्ष न देता केवळ स्वतःची अभ्यासपूर्ण नसलेली माहिती समाज माध्यमांवर टाकून द्वेष पसरविण्याचे कार्य काही संघटना करत आहेत. यामागे केवळ राजकारण हा हेतू आहे. चेतना परिषदेच्या माध्यमातून आपले मुद्दे जनजाती समाजाने घेऊन पुढे जावे. तसेच जनजाती समाजाला न्याय मिळविण्यासाठी आरक्षणाची गरज आहे,” असे प्रतिपादन दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खा. डॉ. भारती पवार यांनी केले. त्या नाशिक येथे आयोजित जनजाती चेतना परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. याप्रसंगी माऊली धामचे महामंडलेश्वर श्री श्री १००८ रघुनाथ महाराज, नाशिकच्या माजी महापौर रंजना भानसी, चेतना परिषदेचे अध्यक्ष परशुराम वाघेरे, प्रांत सचिव शरद शेळके, स्वागत समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना खा
. डॉ. भारती पवार म्हणाल्या की, “जनजाती समूहाने शिक्षणाची कास धरावी. जनजाती समाजाने उच्चशिक्षित होण्यास प्राधान्य द्यावे. जनजाती समाज हा अतिशय सहनशील आहे,” असे त्या म्हणाल्या. अशा वेळी शिक्षण हे जागृतीसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जनजाती समाजात शिक्षणाची जनजागृती होत असून ही अत्यानंदाची बाब असल्याचे त्या म्हणाल्या. निसर्ग उपासक वनवासी समाजाला निसर्गतःच ऊर्जा प्राप्त झाली असून ती ऊर्जा पुढील पिढीत संक्रमित होण्याची गरज आहे. यासाठी जनजाती समाजाने एकत्रित येण्याची गरज आहे. आजही जनजाती बहुल प्रांतात कुपोषणाचे प्रमाण जास्त असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. आजही जनजाती क्षेत्रात मातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंतदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.


यावेळी रघुनाथ महाराज म्हणाले की
, “जनजाती हा हिंदू आहे आणि हिंदूच राहणार. त्याला कोणी बदलू शकत नाही. समाज माध्यमाद्वारे काही लोक हे गैरसमज पसरविण्याचे काम करत आहेत,” असे त्यांनी यावेळी म्हटले. चेतना परिषदेच्या माध्यमातून संस्करांचे बीज फुलविणे आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले. जनजाती समाजाच्या विकासासाठी तन व मन समर्पित करण्याची गरजदेखील त्यांनी यावेळी मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वाघेरे यांनी केले. त्यांनी यावेळी जनजाती चेतना परिषदेच्या आयोजनामागील उद्देश यावेळी उपस्थितांसमोर विशद केला. जनजाती समाजासाठी असणारे शासकीय कायदे, योजना आदींची माहिती जनजाती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ही परिषद महत्त्वाची असल्याचे ते यावेळी म्हणाले. समाजात देशविघातक वृत्ती या सामाजिक अस्वस्थता पसरविण्याचे काम करत असून जनजाती समाजातील शिक्षित लोकांनी एकत्रित येऊन ही अस्वस्थता पसरणार नाही, याबाबत प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी प्रतिपादित केली. यावेळी जनजाती समूहातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.




जनजाती समूहाच्या स्थिती व संस्कृतीवर झाले विचारमंथन

यावेळी पार पडलेल्या सत्रात बोगस आदिवासी एक समस्या याबाबत भाष्य करताना गोवर्धन मुंडे म्हणाले की, “बोगस आदिवासी मुळे आरक्षणाचा फायदा हा खर्‍या जनजाती समूहास होत नाही.” यावेळी त्यांनी जनजाती समाजातील विविध जनजातीचा मूळ रहिवास सोदाहरण विशद केला. मात्र, १९७६ मध्ये क्षेत्र बंधन उठल्यानंतर केवळ नामसाधर्म्याचा फायदा घेत काहींनी जनजाती समूहाचे नागरिक असल्याचे प्रमाणपत्र सादर केले. हेच बोगस आदिवासी असल्याचे ते यावेळी म्हणाले. त्यांनी महादेव कोळी या जनजातीची आढळ, रहिवास विशद करत सर्व कोळी हे जनजाती कोळी कसे झाले व ते कसे असंविधानिक होते, याबाबत विवेचन केले. कोलाम या जातीवर कसे बोगस आदिवासी प्रमाणपत्र प्राप्त केले जाते, याची महिती त्यांनी उपस्थितांना दिली. अनेकांनी जात पडताळणी प्रमाणपत्र कसे बोगस छापून वैद्यकीय अभ्यासक्रमाला कसा प्रवेश घेतला, याची महिती यावेळी सोदाहरण विशद केली. अशा गंभीर परिस्थितीत जनजाती नागरिकांनी अभ्यास करून आवाज उठविणे अपेक्षित असल्याचे ते यावेळी म्हणाले. ‘मनेर वारलु’ शब्द आंध्रप्रदेशमधून वगळण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात तो वगळण्याची मागणी यावेळी त्यांनी विशद केली.


वनवासी कल्याण आश्रमाचे जनजाती हित रक्षा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख युवराज लांडे यांनी यावेळी जनगणनेत जनजातीसाठी वेगळा
धर्म कोड’ची मागणी एक समीक्षा या विषयावर संवाद साधला. यावेळी लांडे यांनी जनगणनेत विविध धर्मांसाठी असणार्‍या आठ स्वतंत्र कोडची समीक्षा केली. यावेळी लांडे म्हणाले की, पहिल्यापासून जनजाती समूह हिंदू परंपरेचा अंगीकार करत आलेला आहे. जनगणनेतदेखील जवळपास ८० टक्क्यांपेक्षा अधिक जनजाती समाजातील नागरिकांनी आपण हिंदू असल्याचे स्वीकारले आहे. उर्वरित जनजाती बांधवांनी ख्रिश्चन व इस्लाम धर्माचा स्वीकार केला आहे. त्यामुळे जनजाती समूहाला घटनेने दिलेले आरक्षण व इतर सुविधा प्राप्त होत आहेत, त्यावर धर्म म्हणून आपत्ती येत नाही. असे असतानादेखील वेगळ्या ‘धर्म कोड’ची मागणी करून काही संघटना समाजाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न का करत आहेत, असा सवाल यावेळी लांडे यांनी उपस्थित केला. तसेच, वेगळा ‘धर्म कोड’च्या मागणीतून जनजाती समूहात फूट पाडून धर्मांतरण प्रक्रियेस चालना देण्याचा हा सर्व प्रकार असल्याचे लांडे यांनी यावेळी प्रतिपादित केले. सचिव शरद शेळके यांनी जनजाती समाजाचा गौरवशाली इतिहास उपस्थितांसमोर विशद करताना वेदकाळातील ’निषाद’ हादेखील जनजातीच असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी रामायण, महाभारतकालीन उदाहरणे देत जनजाती समूहाच्या इतिहासाचे पदर उलगडले. त्यांनी जनजाती चित्रशैली, भाषा, लिपी, संस्कृती आदींच्या माध्यमातून जनजाती समाजाचा इतिहास मांडला. भास्कर खांडवे यांनी अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमाती प्रशासन व नियंत्रण यांतील घटनात्मक तरतुदींची माहिती उपस्थितांना दिली.

@@AUTHORINFO_V1@@