'युरोपियन ख्रिश्चनांनी केलेला ज्यूंचा छळ' या पुस्तकाचे प्रकाशन

    दिनांक  11-Jan-2020 20:15:50
|


book publish_1  


उस्मानाबाद : ९३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात ज्येष्ठ समीक्षक प्रा. बाळकृष्ण कवठेकर यांच्या हस्ते अमिता आपटे लिखित 'युरोपियन ख्रिश्चनांनी केलेला ज्यूंचा छळ' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दै मुंबई तरुण भारताच्या पुस्तक विक्री स्टॉलवर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यापूर्वी संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनीही दै. मुंबई तरुण भारताच्या पुस्तक विक्री स्टॉलला भेट देत विक्रीस असणाऱ्या पुस्तकांचा आढावा घेतला होता. आज दिवसभरात अनेक मान्यवर व विद्यार्थ्यांनी या पुस्तक विक्री स्टॉलला भेट दिली.

 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.