राष्ट्राला शिवराय व गुरू गोबिंद सिंह यांची गरज : अशोक कामत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2020
Total Views |


guru govind singh_1 



नाशिक : “जागतिक पटलावरील एकंदरीत घडमोडी पाहता आणि सामाजिक स्थित्यंतरे लक्षात घेता राष्ट्र आणि समाजास छत्रपती शिवराय आणि गुरू गोबिंद सिंह यांची गरज आहे,” असे प्रतिपादन श्री संत नामदेवजी अध्यासन, पुणेचे प्राध्यापक व अध्यक्ष अशोक कामत यांनी केले. ते येथील गुरू गोबिंद सिंह फाऊंडेशनच्या वतीने ‘साहिबे कमाल गुरू गोबिंद सिंह’ या पुस्तकाच्या मराठी अनुवाद पुस्तक प्रकाशनप्रसंगी बोलत होते.



याप्रसंगी मंचावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ
. ओमप्रकाश कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचारप्रमुख व ज्येष्ठ अभियंता दिलीप क्षीरसागर, अनुवादक प्राचार्य सुभाष भावसार, कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष गुरुदेव सिंह बिर्दी आदींसह फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. गुरुदेव सिंह बिर्दी म्हणाले की, गुरू गोबिंद सिंह महाराज यांच्याबाबत इतर धर्मीय नागरिकदेखील आदर व्यक्त करतात. फाऊंडेशन स्थापन करण्यामागे केवळ अर्थार्जन हा उद्देश नाही. सर्वधर्मीय येथे शिक्षण घेतात. त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेतला.



ओमप्रकाश कुलकर्णी यांनी याप्रसंगी या पुस्तकाच्या माध्यमातून शीखधर्मीय गुरूंची शिकवण समजण्यास मदत होणार असल्याचे म्हटले
. अनुवादक सुभाष भावसार यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, “पुस्तकाचा अनुवाद करणे हा माझ्यासाठी अद्भुत अनुभव होता.” या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश्री कुलकर्णी यांनी केले. फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमिंदर सिंह यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी ग्यानी बालविंदर सिंह (डेहराडूनवाले) यांनी गुरू गोबिंद सिंघ यांचे चरित्र विशद केले.



शीख गुरू परंपरा
, भारतीय एकात्मतेसाठी जागृत ठेवणे आवश्यक

गुरू गोबिंद सिंह यांचे चरित्र हे ओजस्वी आहे. शीख गुरूंची परंपरा तेजस्वी आहे आणि ती जागृत ठेवणे भारताच्या एकात्मतेसाठी आवश्यक आहे. श्री गुरू गोबिंद सिंह यांच्या तेजस्वी विचारांचा अनुवाद या पुस्तकाच्या माध्यमातून झाल्याने मराठी भावबंध निर्माण झाले आहेत. आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने गुरू गोबिंद सिंह यांना अभिवादन करतो. संघाच्या माध्यमातून शिखांच्या गुरूंचे स्मरण केले जात असते.

-दिलीप क्षीरसागर,

पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचारप्रमुख, रा.स्व. संघ

@@AUTHORINFO_V1@@