सासूबाई साजरी करणार सूनबाईंची पहिली ‘मकर संक्रांत’

    दिनांक  11-Jan-2020 16:42:00
|

shubhra_1  H xअभिनेत्री तेजश्री प्रधानने 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून मालिका विश्वात कमबॅक केला आणि पाहता पाहता प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर उचलून धरले. मालिकेची आगळी-वेगळी कथा, मालिकेचे वेगळे टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी या सगळ्यामुळे मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे.


तेजश्रीची ‘शुभ्रा’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. जशास तसं वागणारी आणि वेळे प्रसंगी आपल्या सासूबाईंच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी शुभ्रा ही प्रेक्षकांच्या घरातीलच एक व्यक्ती बनली आहे. आता मकरसंक्रांतीचा सण येतोय आणि सोहम व शुभ्राची ही लग्नानंतरची पहिलीच संक्रांत असल्यामुळे आसावरी शुभ्राचे सगळे लाड पुरवणार आहे. मालिकेत कुलकर्णी कुटुंब हा सण दणक्यात साजरा करणार आहेत. पहिली संक्रात साजरी करण्यासाठी शुभ्रा हलव्याचे दागिने घालून नटलेली प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हलव्याच्या दागिन्यांमुळे तेजश्रीच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. इतकेच नव्हे तर ते सर्व मिळून पतंग देखील उडवणार आहेत. शुभ्राचा पहिला संक्रांत सण प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.