एबीव्हीपी आणि भाजपला बदनाम करण्याचा डाव्यांचा प्रयत्न : जावडेकर

    दिनांक  10-Jan-2020 19:01:52
|


javdekar_1  H xनवी दिल्ली : शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी जेएनयूच्या तोडफोडीप्रकरणी पत्रकार परिषद घेत जेएनएसयू छात्र संघटनेची अध्यक्ष आईशी घोष यांच्यासह जेएनयूमध्ये सर्व्हर रुमची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांची ओळख पटवण्यात आली आहे. यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, 'एबीव्हीपी आणि भाजपवर गेल्या पाच दिवसांपासून करण्यात आलेले आरोप योग्य नाहीत. तसेच हा भाजप आणि एबीव्हीपी विरोधात बदनामीचा मोठा डाव आहे. ही मुद्दाम पूर्वनियोजित घटना होती. हिंसेचे षडयंत्र रचणारी, सीसीटीव्ही आणि सर्व्हर बंद पडणाऱ्या या डाव्या संघटना आहेत." असेही ते यावेळी म्हणाले.पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले कि
,"या घटनेत जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आइशी घोष यांच्यासह माजी विद्यार्थी चुनचुन कुमार, सुचेता आणि प्रिया रंजन या डाव्या संघटनांच्या प्रतिनिधींचा त्यात सामावेश असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.