उद्धवसाहेब, राज्यात पत्रकारांना हात लावायची हिम्मत कशी होते : अतुल भातखळकर

10 Jan 2020 13:57:18


uddhav thackarey_1 &

उस्मानाबाद : उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात दैनिक'मुंबई तरुण भारत'चे वार्ताहर सोमेश कोलगे यांच्या अटकेचा प्रयत्न झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. पोलीस निरिक्षक माने यांनी 'दै.मुंबई तरुण भारत'च्या स्टॉलवर येत सोमेश कोलगे यांना तेथून दूर नेण्याचा प्रयत्न केला. भाजप आमदार






अतुल भातखळकर यांनी ट्विट करत या घटनेचा तीव्र निषेध केला. तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने अघोषित आणीबाणी लागू केली आली आहे का ? या प्रश्नाचे उत्तर ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावे. वार्तांकन करत असणाऱ्या पत्रकाराला हात लावण्याची हिम्मतच कशी होते पोलिसांची याचे महराष्ट्र सरकारने उत्तर द्यावे.

 

Powered By Sangraha 9.0